अभिनेते सचिन पिळगावकर हे काही ना काही कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. काही त्यांची विधानं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही केली जातात. नुकतच त्यांनी अमजद खान बाबत एका मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे तर त्यांच्यावर टीकाही झाली. तर काहींनी त्यांना पाठिंबाही दिला. अमजद खान यांना आपण डायलॉग बोलायला शिकवला असा दावा सचिन यांनी केला होता. 15 ऑगस्टला शोले प्रदर्शित होवून 50 वर्ष झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सचिन यांनी एक पोस्ट केली आहे. ती पोस्टही चांगलीच चर्चेत आहे. त्या पोस्टवर ही कमेंटचा पाऊस पडला आहे.
सचिन पिळगावकर यांनी शोलेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी त्यावेळचा फोटो ही टाकला आहे. शिवाय असं म्हटलं आहे की ‘शोले' ही एक भावना आहे. एक उत्सव आहे. रमेश सिप्पी जी, ज्यांना मी नेहमीच माझे गुरू मानले, त्यांनी मला या महान कलाकृतीचा भाग बनवल्याबद्दल आणि पडद्यामागेही इतकं काही शिकण्याची संधी दिल्याबद्दल, मी त्यांचा सदैव आभारी राहीन. अशी पोस्ट सचिन यांनी केली आहे. चित्रपटात संधी दिल्याबद्दल त्यांनी रमेश सिप्पी यांचे आभार मानले आहेत.
या आधी एका मुलाखतीत सचिन पिळगावर यांनी शोले आणि गब्बर म्हणजेच अमजद खान यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होतं की, "अमजद खानला 'कितने आदमी थे' डायलॉग बोलायला जमतच नव्हता. मी त्याला कानमंत्र दिला. मी अमजदला सांगितलं माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल. कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता." असं त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते. त्यांचा तो व्हिडीओ ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यातून सचिन यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
काही दिवसापूर्वी त्यांनी शोलेतील झोपड्यांचा किस्सा ही सांगितला होता. त्या ते म्हणाले होते शोलेतील गावाचा सेट अप तयार केला. हा सेटप बंगळूरूच्या जवळ होता. त्या गावातील झोपड्या खूप नैसर्गिक दिसत होत्या. पण त्या सर्व झोपड्या खरंतर मेकअप रूम होत्या. त्यांच्या आत AC, सोफा, बल्ब अशा सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या होत्या. जेणेकरून कलाकारांना आणि सेलिब्रिटींना कोणतीही अडचण येऊ नये. सचिन यांनी सांगितल्यामुळे रामगडच्या त्या झोपड्यांचे रहस्य उलगडले होते.