जाहिरात

50 Years Of Sholay: 'शोले' प्रदर्शनाच्या 50 वर्षानंतर उलगडलं रामगढचं रहस्य, त्या झोपड्या...

'शोले'चं शूटिंग बंगळूरूमधील म्हैसूरजवळ रामनगरम नावाच्या एका गावात झालं होतं.

50 Years Of Sholay: 'शोले' प्रदर्शनाच्या 50 वर्षानंतर उलगडलं रामगढचं रहस्य, त्या झोपड्या...

EXCLUSIVE: भारतीय सिनेमातील अविस्मरणीय चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, 'शोले'चं नाव घेतल्याशिवाय ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य, प्रत्येक पात्र आणि प्रत्येक संवाद स्वतःच एक आदर्श बनला आहे. असं कदाचित यासाठी, कारण यापूर्वी किंवा यानंतर असा कोणताही चित्रपट आला नाही. ज्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे प्रेक्षकांचं लक्ष गेलं असेल. त्यामुळेच शोले हा चित्रपट अविस्मरणीय ठरला आहे. 

त्या काळातल्या लोकांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलंय. पण आज ही मीम्सच्या माध्यमातून 'शोले'ला ओळखणारी मुलं आणि आजच्या पिढीवर ही या चित्रपटाचं गारूड आहे हे नाकारून चालणार नाही. या वर्षी 15 ऑगस्टला या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 50 वर्षं पूर्ण होत आहेत. या खास निमित्ताने, एनडीटीव्हीने 'शोले'मध्ये अहमदची भूमिका साकारणारे सचिन पिळगांवकर यांच्याशी संवाद साधला. या संवादात सचिन यांनी रामगढच्या झोपड्यांचं रहस्य उलगडलं आहे. 

नक्की वाचा - 50 Years Of Sholay: शोलेचं गाजलेलं पात्र, पण संपूर्ण चित्रपटात फक्त एकच डायलॉग, त्याला ही समजलं नाही की...

सचिन यांनी सांगितलं, 'शोले'चं शूटिंग बंगळूरूमधील म्हैसूरजवळ रामनगरम नावाच्या एका गावात झालं होतं. हे ठिकाण बंगळूरूपासून सुमारे 40 किलोमीटर दूर होतं. आम्ही सर्वजण बंगळूरूत राहत होतो. शूटिंगसाठी रोज सकाळी 5 वाजता निघायचो. तिथे पोहोचायला आम्हाला जवळपास एक तास लागायचा. पण ती जागा खूपच सुंदर होती. तिथे गावाचा सेट उभारण्यात आला होता. तिथेच मोठ मोठे दगड होते. रमेश सिप्पी यांनी आपल्या कला दिग्दर्शकासोबत मिळून ती जागा निवडली होती. असं सचिन यांनी सांगितलं.   

नक्की वाचा - 50 Years Of Sholay: Emergency मुळे ठाकूर करू शकला नाही गब्बरचा खात्मा

शोलतलं गाव याच ठिकाणी तयार करण्यात आलं होतं. तिथं असलेल्या नैसर्गिक गोष्टींमुळे ते उभारलेलं गावही खरंखरं वाटत होतं.  जिथे त्यांनी एका गावाचा सेट अप तयार केला. त्या गावातील झोपड्या खूप नैसर्गिक दिसत होत्या. पण त्या सर्व झोपड्या खरंतर मेकअप रूम होत्या. त्यांच्या आत AC, सोफा, बल्ब अशा सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या होत्या. जेणेकरून कलाकारांना आणि सेलिब्रिटींना कोणतीही अडचण येऊ नये. सचिन यांनी सांगितल्यामुळे रामगडच्या त्या झोपड्यांचे रहस्य उलगडले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com