71st National Film Awards: 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा झाली आहे. यावर्षी हे पुरस्कार 2023 च्या चित्रपटांसाठी देण्यात आले आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार 'कटहल' ला मिळाला आहे. तर शामची आईला सर्वोत्तम मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.'ॲनिमल' चित्रपटाला विशेष उल्लेख मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट 'भगवंत केसरी' ठरला आहे. सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्मचा पुरस्कार 'द सायलेंट एपिडेमिक' ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी 'सनफ्लावर वर द फर्स्ट वन्स टू नो' या चित्रपटाची निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकाचा पुरस्कार उत्पल दत्ता यांना देण्यात आला आहे. गेल्या वर्षी हे पुरस्कार 2022 च्या चित्रपटांसाठी देण्यात आले होते.
शाहरुख खानने जिंकला पहिला राष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबद्दल बोलायचं झाल्यास, हा पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मैसी यांनी पटकावला आहे. शाहरुख खानला त्याच्या 'जवान' चित्रपटासाठी आणि विक्रांत मैसीला '12th फेल' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे, शाहरुख आणि विक्रांतसाठी हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. तर, अभिनेत्री राणी मुखर्जी हिला 'मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
शामची आई चित्रपट ठरला सर्वोत्तम
71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून शामची आई या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय सुनील डहाके यांनी केले आहे. अमृता फिल्म्सने याची निर्मिती केली होती. मराठी चित्रपट 'जिप्सी' साठी कबीर खंदारे याला तर नाळ 2 साठी ट्रीशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नक्की वाचा - Bin Lagnachi Goshta Teaser : ‘बिन लग्नाची गोष्ट' टीझर रिलीज; नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास
विजेत्यांची यादी:
- सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: उत्पल दत्ता
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (नॉन-फिचर फिल्म): द फर्स्ट फिल्म
- सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन-फिचर फिल्म): गिद्ध द स्कॅव्हेंजर
- सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्ये वाढवणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-फिचर फिल्म): द सायलेंट एपिडेमिक
- सर्वोत्कृष्ट माहितीपट: गुड व्हल्चर अँड ह्युमन
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका (जवान): शिल्पा राव
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: कटहल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री
- सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी (तेलुगू चित्रपट): हनुमान
- सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी: रॉकी और रानी की प्रेम कहानी