नवी मुंबईतील डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात कोल्डप्लेनिमित्ताने मोठी गर्दी पाहायला मिळाली. शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवशी या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीबरोबरच येथील कचऱ्याचा ढीग हा आणखी एक मोठा प्रश्न नवी मुंबई महापालिकेसमोर उभा होता.
हा संगीत कार्यक्रम पाहण्यासाठी देशभरातून चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी देशभर आणि जगभरातून तब्बल 75,000 चाहते उपस्थित होते. यावेळी कोल्डप्लेच्या चाहत्यांनी डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात खूप कचरा केला होता. चाहत्यांनी रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कोल्ड ड्रिक्सचे कॅन, फूल आणि अन्य गोष्टी मोठ्या संख्येने रस्त्यांवर फेकल्या होत्या. त्यामुळे रविवारी पहाटेपर्यंत नऊ हजार किलो कचरा जमा झाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
या कारणास्तव स्टेडियममध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात घाण पसरली आहे. हा कचरा स्वच्छ करण्यासाठी नवी मुंबई मनपाद्वारा रात्री 11 पासून ते पहाटे 3 पर्यंत स्वच्छता अभियान चालवलं. स्टेडियमच्या आजूबाजूला असलेला कचरा स्वच्छ करताना मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना घाम फुटला. या कार्यक्रमासाठी सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
नक्की वाचा : 'जय श्रीराम'चे नारे, मराठीत संवाद ते जसप्रीत बुमराह'; 'कोल्डप्ले"ने जिंकलं!
झिरो वेस्ट इव्हेंट...
18, 19 आणि 21 जानेवारीला आयोजित या कॉन्सर्टची माहिती मनपा आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांना आहे. यासाठी त्यांनी शहरातील स्वच्छतेसाठी झिरो वेस्ट इव्हेंटच्या रुपात हा कार्यक्रम साजरा करण्याची योजना केली. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी आणि कचरा पाहून संबंधित विभागाकडून मनपा आयुक्त डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनावर योजना अमलात आणण्यात आली आणि 100 हून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने संपूर्ण भागाची स्वच्छता करण्यात आली.
दिवसभर फिरत राहिल्या कचऱ्याच्या गाड्या...
कार्यक्रम ठिकाणाच्या जवळपासच्या भागात सतत कचरा उचलण्याच्या गाड्यांची ये-जा सुरू होती. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांनी मनपाने केलेल्या स्वच्छतेसाठी त्यांचं कौतुकही केलं.