जाहिरात

Rupali Bhosale News: अभिनेत्री रुपाली भोसलेच्या गाडीचा भीषण अपघात! नव्या कोऱ्या कारची झाली अशी अवस्था; PHOTO

रुपाली भोसलेने आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. 

Rupali Bhosale News: अभिनेत्री रुपाली भोसलेच्या गाडीचा भीषण अपघात! नव्या कोऱ्या कारची झाली अशी अवस्था; PHOTO

Aai Kuthe Kay karte Marathi Actress Rupali Bhosle Accident:  मराठी मनोरंजन (Marathi Serial)Aai Kuthe Kay Krte Fame Actres Rupali Bhosale Car Accident mercedes benz Damage Video  विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रुपाली भोसलेने स्वतः सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या अपघातात अभिनेत्रीच्या आलिशान कारचे मोठे नुकसान झाले आहे, ज्याचे फोटोही समोर आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आई कुठे काय करते? या मालिकेची नायिका रुपाली भोसलेच्या (Rupali Bhosle) गाडीचा मोठा अपघात झाल्याची बातमी मिळत आहे. या अपघातात अभिनेत्रीच्या आलिशान कारचे (Car Accident) मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये अभिनेत्री अथवा इतर कोणालाही जखम झाली नाही. मात्अ अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वीच घेतलेल्या कारचे नुकसान झाले आहे. रुपाली भोसलेने आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या मर्सिडीज बेंज (Mercedez) कारचा फोटो पोस्ट केला आहे, ज्याचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. यासोबतच तिने एक्सिडेंट झाला, वाईट दिवस! असा कॅप्शनही दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच रुपालीने नवी कार घेतल्याची पोस्ट केली होती. याच नव्या कारचा अपघात झाल्याने अभिनेत्रीने हळहळ व्यक्त केली आहे. 

दरम्यान, अभिनेत्री रुपाली भोसलेची आई कुठे काय करते? मालिका चांगलीच गाजत आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते. माध्यमांवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नवनवीन फोटो, व्हिडिओ तसेच दैनंदिन कामांबाबतचे अपडेट आपल्या चाहत्यांना देत असते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com