Interesting news: अमिर खानला करायचा होता किस, पण तो घाबरला, 'त्या' अभिनेत्रीने तो किस्सा सांगितलाच

केतन मेहता दिग्दर्शित 'होली' चित्रपटात एक किसिंग सीन चित्रित करायचा होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान आज जागतिक स्तरावर ओळखला जातो. मात्र 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'होली' या पहिल्या चित्रपटाच्या वेळी त्याची स्थिती पूर्णपणे वेगळी होती. अभिनेत्री किटू गिडवानीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरसोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी आमिर सिनेसृष्टीत नवा होता. तो अत्यंत शांत स्वभावाचा होता, असे किटूने नमूद केले. त्यामुळे काम करताना ही तो काही वेळा अवघडल्या सारखा वाटायचा. त्याच बरोबर एका किस सीनची माहिती ही तिने यावेळी दिली. 

नक्की वाचा - Rajpal Yadav: अडचणीच्या काळात मदतीला आलेल्या सोनू सूदला राजपाल यादवचा टोला; काय म्हणाला?

केतन मेहता दिग्दर्शित 'होली' चित्रपटात एक किसिंग सीन चित्रित करायचा होता. किटू गिडवानीने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "त्या सीनच्या वेळी आमिर प्रचंड घाबरला होता. तो जितका नर्वस होता, तितकीच मी सुद्धा होते." पुण्याच्या एफटीआयआय (FTII) कॅम्पसमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांसारख्या दिग्गजांचाही समावेश होता. अमिरवर तो सीन करताना प्रचंड दडपण होते. तो सीन करताना बाचकत होता अशी आठवण ही यावेळी किटूने सांगितली. 

Advertisement

नक्की वाचा - VIDEO: अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा युद्धभुमीत अडकला! रडत रडत मागितली मदत, '4 दिवसांपासून तो'

किटूच्या मते, आमिरला त्यावेळी पैशांची किंवा प्रसिद्धीची ओढ नव्हती. तर त्याला केवळ चांगल्या सिनेमाची ओढ होती. आजही ती आमिरला आपला एक चांगला मित्र मानते. किटू गिडवानीने एका मुलाखतीत सांगितले की, "तो सीन शूट करताना आमिर खूपच अस्वस्थ होता. आम्ही दोघेही नवखे होतो आणि त्या सीनमुळे आम्हाला खूप दडपण आले होते." आमिर दिसायला खूप साधा आणि लाजाळू होता, असेही तिने सांगितले. केतन मेहतांच्या या चित्रपटाने कॉलेज जीवनातील प्रश्नांवर भाष्य केले होते.