जाहिरात

Rajpal Yadav: अडचणीच्या काळात मदतीला आलेल्या सोनू सूदला राजपाल यादवचा टोला; काय म्हणाला?

Rajpal Yadav: 9 कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर राजपाल यादवने सोनू सूदच्या 'काम मागण्याच्या' विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कामासाठी कोणाकडेही हात पसरण्याची त्यांना गरज नाही.

Rajpal Yadav: अडचणीच्या काळात मदतीला आलेल्या सोनू सूदला राजपाल यादवचा टोला; काय म्हणाला?

बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव 9 कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगात जाऊन आल्यानंतर सध्या चर्चेत आहे. विशेषतः अभिनेता सोनू सूद याने राजपाल यादवसाठी कामाची विनंती केल्यानंतर, आता स्वतः राजपाल यादव यांनी त्यावर आपली स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे.

राजपाल यादवच्या कठीण काळात अभिनेता सोनू सूद मदतीसाठी पुढे आला होता आणि त्याने फिल्म इंडस्ट्रीतील निर्मात्यांना राजपाल यांना काम देण्याची विनंती केली होती. मात्र, आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव यांनी या विषयावर आपली बाजू मांडली असून एक प्रकारे सोनू सूदची 'ती' विनंती फेटाळून लावली आहे.

एका मुलाखतीदरम्यान राजपाल यादव यांनी सोनू सूदच्या कमेंटवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "कृपया हा गैरसमज दूर करा की मला वारंवार काम मागावे लागते. काम मागण्यात कोणतीही शरम नाही, पण सिनेमा हे माझे पॅशन आहे आणि मी असे काम करतो की मला चार पटीने जास्त काम मिळते. मी सुट्टीच्या दिवशीही काम करतो. गेल्या 11 वर्षांपासून काम माझ्यासोबतच जगत आहे. मला कोणाकडेही कामासाठी विनवणी करण्याची गरज पडलेली नाही."

(नक्की वाचा-  Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं)

सोनू सूदने काय म्हटले होते?

राजपाल यादव जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा सोनू सूदने 'एक्स' वर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. "राजपाल यादव हे आपल्या इंडस्ट्रीसाठी एक अनमोल देणगी आहेत. कधीकधी काळ कोणावरही अन्याय करतो. ते माझ्या पुढच्या सिनेमाचा भाग असतील. आपण सर्वांनी (निर्माते, दिग्दर्शक) मिळून त्यांना थोडे साइनिंग अमाऊंट देऊन कामात ॲडजस्ट करायला हवे. हे दान नाही, तर सन्मान आहे."

राजपाल यादवचे आगामी चित्रपट 

  • तुरुंगातून परतल्यानंतर राजपाल यादवकडे मोठ्या चित्रपटांची रांग लागली आहे.
  • भूत बंगला: दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत या वर्षातील त्यांचा पहिला मोठा चित्रपट.
  • वेलकम टू द जंगल: यामध्ये 27 दिग्गज कलाकारांची मोठी फौज आहे.
  • हैवान:  या चित्रपटात त्यांची एक छोटी पण अत्यंत प्रभावी भूमिका आहे.
  • दोन वेब सीरिज आणि दोन इतर चित्रपटांचे कामही त्यांच्याकडे आहे, ज्याची घोषणा लवकरच होईल.
     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com