आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार? 59 वर्षांच्या अभिनेत्यानं केला खुलासा

Aamir Khan on Third Marriage : अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींसाठी चर्चेत आहे. आमिरनं आत्तापर्यंत दोन लग्न केले आणि दोन्ही पत्नीपासून घटस्फोट घेतला

जाहिरात
Read Time: 2 mins
Aamir Khan : तिसऱ्या लग्नाच्या चर्चेवर आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई:

अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींसाठी चर्चेत आहे. आमिरनं आत्तापर्यंत दोन लग्न केले आणि दोन्ही पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यानं पहिलं लग्न रिना दत्ताबरोबर केलं होतं. ते 16 वर्ष टिकलं. आमिर आणि रिना यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. दुसरी बायको किरण रावपासून त्याला आझाद हा मुलगा आहे. आमिर आणि किरण राव यांचा 2021 साली घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर लगेच आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरु झाली. आमिरनं याबाबत आजवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्यानं त्याबाबत उलट-सुलट चर्चा होत होत्या. आता अखेर आमिरनं तो तिसरं लग्न करणार की नाही? याबात खुलासा केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आमिर खाननं नुकतीच रिया चक्रवर्तीला तिच्या पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रियानं आमिरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रश्न विचारले. रियानं आमिररला तिसरं लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर 'मी आता 59 वर्षांचा आहे. मी पुन्हा लग्न करेन असं वाटत नाही,' असं उत्तर आमिरनं दिलं.

Advertisement

आमिर यावेळी बोलताना पुढं म्हणाला की, 'सध्या माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत. मी माझ्या कुटुंबाशी पुन्हा जोडला गेलोय. मुलं, भाऊ-बहीण हे सर्व माझ्या जवळ आहेत.' सध्या माझ्याजवळ अनेक लोकं आहेत. मी त्यांच्यासोबत आनंदी आहे. मी सध्या एक चांगला व्यक्ती होण्यासाठी काम करत आहे, असं आमिरनं सांगितलं.

Advertisement

( नक्की वाचा : सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'या' पोस्टमुळे चर्चेला उधाण )

आमिर खानचा यापूर्वीचा चित्रपट 'लाल सिंग चड्डा' होता. 2022 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यापूर्वी कतरिना कैफसोबतचा 'ठग ऑफ हिंदुस्तान'हा आमिरचा सिनेमा देखील चालला नाही. सलग दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानं आमिरच्या चित्रपट कारकिर्दीला मोठा सेटबॅक बसला आहे. तो सध्या 'तारे जमीं पर' या त्याच्या 2007 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम करत आहे.

Advertisement