Sai Tamhankar News : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनं आता हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही जम बसवला आहे. आपण फक्त ग्लॅमरस दिसणं आणि बोल्ड दृश्य देण्यापुरतं मर्यादीत नाही. सशक्त भूमिकाही तितक्याच दमदारपणे करु शकतो, हे सईनं वेळोवेळी दाखवून दिलंय. त्यामुळेच चित्रपट सृष्टीशी काहीही संबंध नसलेल्या या सांगलीच्या मुलीनं इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलंय.
सईच्या पडद्यावरील भूमिकांप्रमाणेच तिचं वैयक्तिक आयुष्य देखील नेहमी चर्चेत असतं. सईचं 2013 साली निर्माता अमेय गोसावीशी लग्न झालं होतं. पण, त्यांचं लग्न दोन वर्षच टिकलं. सई आणि अमेयचा दोन 2015 साली घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या पेपरवर ज्या दिवशी कोर्टात सही केली त्याच दिवशी आपण पार्टी केल्याचं साईनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
ट्रेंडिंग बातमी - अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो?
अमेय गोसावीशी घटस्फोट झाल्यानंतर सईनं पुन्हा लग्न केलं नाही. ती गेल्या काही दिवसांपासून निर्माता अनिश जोगला डेट करत असल्याची चर्चा होती. त्या दोघांनी एकत्र अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सईच्या या नव्या प्रेमप्रकरणात ट्विस्ट आला असून तिचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आता सुरु झालीय.
सई ताम्हणकरच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळेच ही चर्चा रंगलीय. I am Single By Choice. Not My Choice. But It's Still A Choice (मी माझ्या मर्जीनं सिंगल आहे. ही माझी निवड नाही. पण, तरीही ही माझी मर्जी आहे.) अशी पोस्ट सईनं केली आहे. विशेष म्हणजे सईनं या पोस्टला #Truestory हा हॅशटॅग वापरलाय.
सईनं काही दिवसांपूर्वी अनिशसोबत डेट करत असल्याचं एका पोस्टमध्ये कबुल केलं होतं. सईला दौलतराव सापडला या अर्थाची तिची पोस्ट आणि अनिशचा फोटो सईनं शेअर केला होता. सईची भूमिका असलेल्या 'गर्लफ्रेंड', 'धुराळा', 'वाय झेड' या चित्रपटाचा अनिश निर्माता होता. पण, या दोघांचं नातं आता बिनसलं असल्याची चर्चा सईच्या ताज्या पोस्टमुळे रंगली आहे. स्वत: सई किंवा अनिश यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
ट्रेंडिंग बातमी - अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेत अमिताभ बच्चन यांचा विवाहित जोडप्यांना महत्त्वाचा सल्ला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world