Rajinikanth Coolie Movie : बॉलिवूडचा हा खान रजनीकांत यांच्या कुली सिनेमात कॅमिओ करणार

लोकेश कनगराज यांचे 2019 साली कैथी (Kaithi Movie), 2022 साली विक्रम (Vikram Movie), आणि 2023 साली लिओ (Leo Movie) हे चित्रपट प्रदर्शित  झाले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकेश कनगराज (Lokesh Kanagaraj) आणि रजनीकांत (Rajinikanth) यांचा आगामी चित्रपट कुली (Coolie Movie Rajinikanth) मध्ये  आमिर खान (Aamir Khan) पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.  आमिर हा चित्रपटाच्या शेवटच्या 15 मिनिटांत दिसणार असून धडाकेबाज त्याचे अॅक्शन सीन्स पाहायला मिळतील. आमिर खानच्या कॅमिओमुळे चित्रपटात जबरदस्त ट्विस्ट येणार आहे.  

(नक्की वाचा: Emergency मुळे ठाकूर करू शकला नाही गब्बरचा खात्मा)

पिंकविलाने दिलेल्या बातमीनुसार, 'कुली'मध्ये रजनीकांत आणि आमिर खान यांच्यातील सुपरडुपर अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहे. या सीनच्या शूटींगसाठी आमिरने 10 दिवस राखून ठेवले होते. दृश्य चित्रीत होताना त्यात कोणतीही त्रुटी राहू नये याची आमिरने पुरेपूर काळजी घेतली आहे. हा सीन या चित्रपटाचे सगळ्यात मोठे आकर्षण ठरेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. 'कुली' चित्रपटासाठी 375 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून यात तेलुगू अभिनेता नागार्जुन, श्रुती हासन, सत्यराजही दिसणार आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा: शाहरूख खानच्या 'मन्नत' चा मार्ग मोकळा, BMC नं दिली मोठी परवानगी)

लोकेश कनगराज आणि रजनीकांत हे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. लोकेश कनगराज यांचे याआधीचे चित्रपट जबरदस्त गाजले होते. त्यातच आता त्यांच्या चित्रपटात रजनीकांत हे प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने या चित्रपटाचे हक्क डोळे विस्फारायला लावणाऱ्या किंमतीत विकले गेले आहेत. चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय राइट्स Ayngaran International कंपनीने 68 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा मुकाबला हृतिक रोशन आणि ज्यु.एनटीआर यांची प्रमुख भूमिका असलेल्या वॉर-2 सोबत होणार आहे.  या बॉक्स ऑफिस वॉरमध्ये कोण कोणावर मात करतं याचा फैसला प्रेक्षक करतील

Advertisement

लोकेश कनगराज यांचे 2019 साली कैथी (Kaithi Movie), 2022 साली विक्रम (Vikram Movie), आणि 2023 साली लिओ (Leo Movie) हे चित्रपट प्रदर्शित  झाले होते. या तीनही चित्रपटांची कथानके एकमेकांत गुंफलेली आहेत. यातल्या कैथीचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातून या तीनही चित्रपटातील पात्रे एकमेकांशी कशी जोडली जातात हे कळण्याची दाट शक्यता आहे. 2023 साली नेल्सन यांनी दिग्दर्शित केलेला जेलर (Jailer Movie) चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. या तमिळ चित्रपटामध्ये मल्याळम चित्रपटांचा सुपरस्टार मोहनलाल आणि कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार शिवा राजकुमार हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये इतर भाषेच्या सुपरस्टार्सना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत घेण्याचा एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. लोकेश कनगराज यांनी कुलीसाठीही हाच ट्रेंड वापरला आहे. त्यांनी तेलुगू चित्रपटातील प्रमुख कलाकारांसोबतच हिंदी अभिनेत्यांनाही आपल्या चित्रपटात घेतलं आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article