आराध्यानं ऐश्वर्या-अभिषेकसोबत 'कजरा रे' गाण्यावर केला जबरदस्त नाच, छोटी बच्चनच्या डान्सचा Video Viral

Aaradhya Bachchan : या सर्वांनी कजरा रे या सुपरहिट गाण्यावर डान्स केला. अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चनवर हे गाणं चित्रित झालं आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Aaradhya Bachchan Dance Video Viral : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत जोडप्यांमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) यांचा समावेश आहे. हे जोडपं सहकुटुंब एका लग्नात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी त्यांची मुलगी आराध्या बच्चनसोबत  (Aaradhya Bachchan) डान्स केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या सर्वांनी कजरा रे या सुपरहिट गाण्यावर डान्स केला. अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चनवर हे गाणं चित्रित झालं आहे. बच्चन कुटुंबाचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

अभिषेक आणि ऐश्वर्या नुकत्याच पुण्यात एका लग्नासाठी गेले होते. लग्नातील संगीत कार्यक्रमात बॉलिवूडच्या स्टार जोडप्यानं डान्स केला. अभिषेक-ऐश्वर्यासह आराध्यानंही स्टेजवरही धमाल केली. विशेषत: कजरा रे गाण्यावर तिघांनीही दमदार परफॉर्मन्स केला. आराध्यानं यावेळी तिच्या आईसारखाच नाच केला. तो पाहून सर्वजण चकीत झाले.  

( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )

बच्चन परिवारानं लग्नात केलेला हा डान्स इंटरनेटवर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात जुनी केमिस्ट्री दिसतीय. तर आराध्यानं देखील आत्मविश्वासाननं डान्स केला आहे. यावेळी आराध्या तिच्या आईसारखीच आहे, अशी प्रतिक्रिया फॅन्स देत आहेत. 

Advertisement

बंटी आणि बबली या 2005 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील हे गाणं आहे. 20 वर्षानंतरही या गाण्याची जादू कायम आहे. आता अभिषेक, ऐश्वर्यासह आराध्यानं या गाण्यावर नाच केल्यानं हा प्रसंग आणखी खास बनला आहे.