Abhishek Bachchan- Aishwarya Rai Bachchan : अभिषेक बच्चन आमि ऐश्वर्या राय बच्चन या बॉलिवूडमधील पॉवर कपलच्या संसारात सध्या वादळ सुरु असल्याची जोरदार चर्चा आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात हे दोघंही स्वतंत्रपणे आले होते. त्यापाठोपाठ अभिषेकनं सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधीची एक पोस्ट लाईक केल्यानं ही चर्चा आणखी बळावली.अभिषेकनं लाईक केलेल्या पोस्टमध्ये ग्रे डिव्होर्स (Grey Divorce) जगभरात वाढत असलेलं प्रमाण याबाबतचा उल्लेख होता. त्यानंतर ग्रे डिव्होर्स या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ग्रे डिव्होर्स म्हणजे काय?
लग्न हा प्रत्येक संस्कृतीमधील एक पवित्र आणि महत्त्वाचा संस्कार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये तर जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका व्रत देखील करतात. पण, दुर्दैवानं सर्वच विवाह जन्मोजन्मी सोडा एक जन्म देखील टिकत नाहीत. लग्नानंतर पती-पत्नीमधील मतभेद टोकाला गेल्यानंतर एकत्र राहून त्रास सहन केल्यापेक्षा ते जोडपं काडीमोड घेऊन एकमेकांपासून वेगळे होतात. लग्नानंतर काही वर्षांनीच घटस्फोट घेऊन हे जोडपं त्यांचं आयुष्य स्वतंत्रपणे सुरु करतात. या प्रकारच्या घटस्फोटापेक्षा 'ग्रे डिव्होर्स' हा वेगळा प्रकार आहे.
वयाची चाळीशी किंवा पन्नाशी ओलांडल्यानंतर जोडपं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेऊन परस्परांना घटस्फोट देतात. घटस्फोटाचा हा प्रकार म्हणजे ग्रे डिव्होर्स. या प्रकारातल्या जोडप्यानं बराच काळ एकमेकांसोबत आयुष्य घालवलं असतं. संसारातील जबाबदाऱ्या एकत्र पूर्ण केल्या असतात. मुलांना एकत्र मोठं केलं असतं. त्यानंतर ते दोघं एकमेकांपासून वेगळं होण्याचा अवघड निर्णय घेतात.
( नक्की वाचा: अभिषेक बच्चनची एक कृती आणि पुन्हा सुरु झाली ऐश्वर्यासोबतच्या मतभेदांची चर्चा )
हा शब्द प्रामुख्यानं ग्रे केसांशी संबंधित आहे. या वयातील व्यक्तींच्या सामान्यपणे हा केसांचा रंग असतो. त्या रंगापासून 'ग्रे डिव्होर्स' हा शब्द प्रचलित झाला आहे. अमेरिकेत 2004 साली हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला. त्यानंतर जगभर या प्रकारच्या घटस्फोटांचा ट्रेंड वाढत आहे.
काय आहेत ग्रे डिव्होर्सची कारणं?
समान उद्देश संपणे : मुलं मोठी झाल्यानंतर शिक्षण, करिअर किंवा अन्य कारणांसाठी घर सोडून जातात त्यावेळी आपला समान उद्देश संपल्याची भावना जोडप्यामध्ये निर्माण होते. त्यामधून ते वेगळं होण्याचा विचार करु लागतात.
आर्थिक कारण : नवरा-बायकोमध्ये आर्थिक कारणांमुळे एकमत नसणे हे देखील तणावाचं एक कारण असू शकतं. अनेकदा त्यांच्यात आर्थिक कारणांमुळे मतभेद असतात. विशेषत: दोघांमधील एकच व्यक्ती कमावत असेल आणि तोच सर्व आर्थिक निर्णय घेत असेल तर नात्यामध्ये असंतुलन आणि नाराजी निर्माण होते.
( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
निवृत्ती : निवृत्तीनंतर जोडपी अधिक काळ एकत्र घालवतात. सतत एकत्र राहण्यानं त्यांच्यामधील मतभेद आणखी वाढतात. निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं जगायचं? यावर त्यांच्यात सहमती होत नाही.
धोका : जोडीदारापैकी एकाचं विवाहबाह्य प्रेमप्रकरण असेल तर धोका दुसऱ्या व्यक्तीला सहन होत नाही. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात मुलं किंवा अन्य जबाबदारीमुळे या विषयावर समोरच्याला सुधारण्याची संधी दिली जाते. पण, वयाच्या या टप्प्यात सर्व मार्ग संपल्यानं घटस्फोट हाच पर्याय शिल्लक राहतो.
आर्थिक स्वातंत्र्य : सध्याच्या काळात महिला देखील पुरुषांच्या बरोबरीनं कमावत आहेत. योग्य प्रकारे अर्थार्जन करण्याची आणि स्वत:च्या तत्वांवर आयुष्य जगणं शक्य असेल तर महिला असमाधानकारक विवाहातून बाहेर पडण्याचा मार्ग स्विकारतात.
घटस्फोटाला मान्यता : आपला समाजात आता घटस्फोटाला मान्यता मिळू लागली आहे. सामाजिक दडपण कमी झाल्यानं आता जोडपी सहज घटस्फोट घेऊ लागली आहेत.
( नक्की वाचा : ना नवरा, ना वरात, तरीही इथं मुली करतायत लग्न, काय आहे प्रकार? )
कोणत्या सेलिब्रेटिंनी घेतलाय ग्रे डिव्होर्स?
हिंदी चित्रपटसृष्टीत ग्रे डिव्होर्स हा नवा प्रकार नाही. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक किरण राव यांनी 15 वर्षांच्या संसारानंतर 2021 साली ग्रे डिव्होर्स घेतला होता. अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया हे 21 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून वेगळे झाले. अरबाज खान आणि मलाईका अरोरा यांनीही 20 वर्ष वैवाहिक आयुष्य एकत्र घालवल्यानंतर घटस्फोट घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world