Rahul Roy Reel Video: राहुल रॉय हे सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांचा फक्त एकच सिनेमा सुपरहीट ठरला, पण त्याच एका सिनेमाने त्यांना रातोरात स्टार बनवले. वर्ष 1990 मध्ये आशिकी सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्या दिवसापासून ते आजही प्रेक्षकवर्ग राहुल रॉय यांना त्याच सिनेमाचा हीरो म्हणून ओळखले जाते. राहुल रॉय सहसा पापाराझी व्हिडीओंच्या माध्यमातून चर्चेत असतात, पण 29 एप्रिल रोजी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काहीतरी वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. एका कंटेट क्रीएटरची रील प्रचंड व्हायरल होत होती, ज्यामध्ये ती क्रीएटर राहुल रॉय यांच्यासोबत 'आशिकी' सिनेमाच्या गाण्यावर रील बनवत होती.
रीलमध्ये राहुल रॉय यांना पाहून चाहते हैराण | Rahul Roy Reel Video
राहुल रॉय यांचा रील व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला, तेव्हा प्रत्येकजण हाच प्रश्न विचारत होता की, अखेर त्यांना हे काम करण्याची गरज काय? अनेकांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरही प्रश्न उपस्थित केले की, अभिनेता असूनही राहुल रीलमध्ये अजिबात अभिनय करताना दिसत नाहीत. तर काहींनी असे म्हणायला सुरुवात केली की, अशी कोणती परिस्थिती होती ज्यामुळे त्यांना हा रील व्हिडीओ करावा लागला. आता या सर्व प्रश्नांवर राहुल रॉय यांनी स्वतः उत्तर दिले आहे.
(नक्की वाचा: 'स्वराज्यरक्षक संभाजी'फेम प्राजक्ता गायकवाडचे कमबॅक, महेश मांजरेकरांच्या लेकीचीही मालिका विश्वात एण्ट्री, प्रोमो पाहिला?)
राहुल रॉय यांचा व्हायरल व्हिडीओ
खिल्ली उडवणाऱ्यांना राहुल रॉय यांचे उत्तर
राहुल रॉय यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले,"मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि नम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांचा खर्च उचलावा लागत आहे आणि हे खटले आजचे नाहीत, तर मला ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वीचे आहेत. जर तुम्ही माझ्या साधेपणाची खिल्ली उडवत असाल किंवा माझ्या संघर्षावर हसत असाल, तर हे कृत्य माझ्याबाबत कमी आणि तुमच्याबद्दल अधिक सांगते."
राहुल रॉय यांचे सडेतोड प्रत्युत्तर, वाचा पोस्ट
राहुल रॉय पुढे असेही म्हणाले की, "जर तुम्हाला खरोखरच माझी एवढी काळजी असेल, तर कृपया मला काहीतरी चांगले काम शोधण्यासाठी मदत करा, जेणेकरून मी या खटल्यांचा खर्च भागवू शकेन. किमान मी माझ्या कष्टाने कमवत आहे, इतरांचा अपमान करून नाही. ब्रेन स्ट्रोकनंतर माझ्यासाठी सक्रिय राहणे खूप गरजेचे आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत काम करू इच्छितो. यामुळे माझे मन सक्रिय राहते आणि मला एक उद्देश तसेच जबाबदारीची जाणीव मिळते की मी आजही काम करत आहे. हो, कधीकधी थोडा त्रास नक्कीच होतो, पण तुम्ही मला तोडू शकत नाही."