सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफूल शहजाद हा मूळचा बांगलादेशातील (Saif Ali Khan Attacker) असून त्याने शाहरूख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घराची रेकी केल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान अंगकाठीने जेमतेम आणि सैफ अली खानच्या शरीरयष्टीच्या तुलनेत किरकोळ असलेल्या या आरोपीवर नियंत्रण आणणं सैफ अली खानला का जमलं नाही? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल शहजाद हा बांगलादेशातील कुस्तीपटू आहे. त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती आणि तो त्याच्या परिसरात खूप कुस्ती खेळायचा. मोहम्मद शरीफुलने स्थानिक पातळीवर काही कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतले होते. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने बांगलादेशात राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळली आहे. त्यामुळे त्याला यातील डावपेच चांगले माहीत असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
याच कारणामुळे आरोपीचे शरीर आणि शरीरयष्टी इतकी घट्ट होती. आणि तो चपळ आहे. जेव्हा तो सैफची मोलकरीण लिमावर हल्ला करत होता, तेव्हा सैफने आरोपीची कंबर घट्ट धरली, त्यानंतर आरोपीने कुस्तीच्या चालींनी सैफला नियंत्रित केले. प्रथम त्याने त्याच्या मानेवर मागच्या बाजूला वार केला आणि त्यानंतर त्याच्या पाठीवर चाकूने वार करायला सुरुवात केली ज्यामुळे चाकूचा एक भाग तुटला.
नक्की वाचा - Saif Ali Khan : शाहरुख, सलमान, आमीरच्या घराची रेकी, अन् प्लानही ठरवला; आरोपीचा धक्कादायक खुलासा
चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी, रिक्षातून प्रवास करत असताना, त्याला एका ऑटो चालकाकडून कळले की वांद्रे परिसरात अनेक मोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक राहतात. त्याच दिवशी, आरोपीने एक चोरी करण्याचा कट रचला आणि सैफ अली खान यांनी ही इमारत निवडली कारण खाली हिरवळ होती, त्यामुळे चढताना पडण्याची शक्यता असल्यास, गंभीर दुखापत होणार नाही.
आरोपी मोहम्मद शरीफुल शहजादने सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी इतर काही सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती असंही समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. आरोपी एक कोटी रुपये चोरण्याच्या उद्देशाने गेला होता आणि या पैशांसह बांगलादेशला जाण्याचा विचार करत होता. सैफच्या मोलकरणीनेही तिच्या निवेदनात एक कोटी मागितल्याचा उल्लेख केला आहे.