Aadesh Bandekar Fake News: निधन, श्रद्धांजली, काळजीचे फोन! आता या सर्वांना पोहोचवण्याची वेळ आलीय, आदेश बांदेकर संतापले

Adesh Bandekar Death Fake News: अभिनेते आदेश बांदेकर यांनी फेक न्युजबाबतचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Adesh Bandekar Death Fake News: आदेश बांदेकर यांच्याबाबतची फेक न्यूज

Aadesh Bandekar Death Fake News : सोशल मीडियामुळे चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्याच प्रकारे यामुळे काही लोकांचे नुकसान देखील होते. या माध्यमाचा वापर करून काही लोक सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंतच्या खोट्या बातम्या पसरवून त्रास देताना दिसत आहेत. या वृत्तीमुळे संबंधित व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबीयांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अभिनेते आदेश बांदेकर यांना देखील फेक न्युजचा सामना करावा लागला आहे. सोशल मीडियावर आदेश बांदेकर यांच्या प्रकृतीबाबतचे खोटे वृत्त पसरवले जात आहेत. बांदेकरांबाबत चिंता वाटू लागल्याने जवळच्या लोकांनी त्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि फेक न्युजचे सत्य समोर आले. अखेर आदेश बांदेकर यांनी जवळच्या लोकांसह चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सुखरूप असल्याची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आदेश बांदेकर यांनी नेमके काय म्हटलंय?

"मी अत्यंत व्यवस्थित आणि सुदृढ आहे. सुखरुप प्रवास करतोय, कारण काळजीपोटी इतक्या जणांचे मला फोन येत आहेत आणि जे संपर्क साधू शकत नाहीयेत ते हळहळ व्यक्त करत आहेत. यामागील कारणही तसेच आहे. आपले खूप हितचिंतक असतात तसेच कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरवत असतात. आता ही वृत्ती आहे या वृत्तीला कोणी काही करू शकत नाही.

बरं, बातम्या पसरवत असताना आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले इथंपासून ते अगदी निधनापर्यंत, श्रद्धांजली सुद्धा काही जणांनी अर्पण केल्या आहेत. हे सारं काही माझ्यापर्यंत होते तोपर्यंत ठीक होते, मी हसण्यावारी नेले. या सर्व वृत्तीकडे दुर्लक्ष करत होतो. पण आताच मी सोशल मीडियावर पाहिले तर मनोरंजन क्षेत्रातले अनेक दिग्गज, अनेक कलावंत जे  इतके काम करत आहेत, प्रवास करत आहेत.  त्यांच्याबाबतच्या बातम्या सुद्धा अशाच होत्या. 

Advertisement

कोणाचा घाटात अपघात झाला, संपूर्ण बसचा अपघात झाला तर कोणाला थेट पोहोचवण्यापर्यंत. आता या सर्वांना पोहोचवण्याची वेळ आलीय, असं मला वाटतं. पोहोचवयाचं असेल तर ही वृत्ती नाहीशी व्हायला पाहिजे. ही वृत्ती नाहीशी करायची असेल तर स्वतःचे व्ह्युज वाढवण्यासाठी इतरांच्या नावाचा वापर करून चार पैसे कमावण्याचा हा जो धंदा आहे ना तो बंद पाडायचा असेल तर याला जास्तीत जास्त लोकांनी रिपोर्ट केले पाहिजे.

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Saleel Kulkarni Video : 'नवीन डेटा पॅक दे रे'; सोशल मीडियाचं भयाण वास्तव, प्रत्येकाने ऐकावी अशी कविता)

कारण ही वृत्ती अत्यंत घातक आहे आणि त्यांच्यामुळे कोणाचं तरी नकळत नुकसान होऊ शकते. तेव्हा या वृत्तीला श्रद्धांजली वाहावी असे मला मनापासून वाटतं आणि किमान 25 ते 30 मराठी इंडस्ट्रीतल्या कलावंताबद्दल अशा पद्धतीची बातमी आपल्याआपल्या पेजवर टाकणाऱ्या वृत्तीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. हसावं नाही तर काय करावे? मी मात्र व्यवस्थित - सुदृढ आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या काळजी पोटी मला फोन केला, सर्वांना सांगतो मी व्यवस्थित आहे"