Nana Patekar Vanvaas : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या शानदार अभिनयाव्यतिरिक्त बिनधास्त स्वभावासाठीही ओळखले जातात. नाना पाटेकर यांचा आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'वनवास' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नानांनी 'कौन बनेगा करोड़पति 16' या टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमादरम्यान नानांना धकधक गर्ल माधुरी दीक्षितची आठवण आली. त्यांनी माधुरी दीक्षितचे कौतुक केले आणि तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याची माहितीही चाहत्यांसोबत शेअर केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका प्रश्नामुळे माधुरी दीक्षितच्या आठवणी झाल्या ताज्या
कार्यक्रमामध्ये एका प्रेक्षकानं नाना पाटेकर यांना 'वजूद' सिनेमामध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्याच्या अनुभवासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देत नाना पाटेकर यांनी सांगितले की,"माधुरी दीक्षितसोबत काम करण्याचा अनुभव शानदार होता. ती एक असामान्य अभिनेत्री आणि सुंदर डान्सर आहे. अभिनेत्री होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण तिच्यामध्ये आहेत. याव्यतिरिक्त ती एक उत्तम व्यक्ती आहे आणि यासाठी मी तिचे कौतुक करतो".
(नक्की वाचा: Danny Pandit : फेमस रिल स्टार डॅनी पंडित अडकला विवाहबंधनात, पत्नीसोबत शेअर केला फोटो)
प्रेक्षकांनी 'कैसे बताऊं मैं तुम्हें' या कवितेबाबतचाही किस्सा नाना पाटेकरांना विचारला. सिनेमामध्ये ही कविता नाना माधुरीला ऐकून दाखवत असल्याचा सीन आहे.
माधुरीमुळे 'कविता' आजही लक्षात
नाना पाटेकर म्हणाले की,"ही कविता जावेद अख्तर साहेबांनी लिहिली होती आणि 30-35 वर्षांनंतरही माधुरीमुळे ही कविताच्या माझ्या आठवणीत कायम आहे. ही कविता मी तिला ऐकवली होती, त्यामुळे त्याच्या आठवणी आजही माझ्या लक्षात आहेत. मला असं वाटतंय की आजही त्या ओळी माझ्या रक्तात वाहताहेत. जेव्हा कोणीही कवितेबाबत प्रश्न विचारतात, तेव्हा या सर्व आठवणी पुन्हा जाग्या होतात".
(नक्की वाचा: IMDbची 2024मधील टॉप 10 भारतीय सिनेमांची यादी, ब्लॉकबस्टर साऊथ सिनेमाने बॉलिवूडला टाकलं मागे)
नाना पाटेकर कार्यक्रमामध्ये उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासह सहभागी झाले होते. यावेळेस त्यांनी प्रेक्षकांना मनोरंजक किस्से सांगून मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर नाम फाऊंडेशनसाठी खेळले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि याप्रति जागरुकता पसरवणे तसेच आर्थिक मदतीसाठी नाना काम करताहेत.