आर.माधवन याला बायकोने लाथ मारून घराबाहेर का हाकललं ?

R Madhavan Recalls How Wife 'Kicked' Him Out: आर.माधवन आणि त्याची पत्नी सरिता बिरजे यांचा प्रेमविवाह आहे. या दोघांची ओळख कोल्हापुरात झाली होती

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

'धुरंधर' चित्रपटात साकारलेल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकेमुळे अभिनेता आर.माधवन हा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. रोमँटीक हिरो ते टक्कल पडलेला काही वयस्कर गुप्तचर विभागातील अधिकारी हा माधवनचा प्रवास थक्क करणारा आहे. आर.माधवन याने  त्याच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे. माझ्या बायकोने मला लाथ मारून घराबाहेर हाकललं होतं असं माधवन याने म्हटलं आहे. कोरोनाच्या काळात आपल्यासोबत हा प्रसंग घडला होता असं त्याने म्हटलं आहे. 

नक्की वाचा: Aishwarya Rai: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याची अभिषेकसाठी ती पोस्ट; त्या एका चुकीमुळे अभिनेत्री ट्रोल

सरिता बिरजेने नेमकं काय केलं ?

आर.माधवन आणि त्याची पत्नी सरिता बिरजे यांचा प्रेमविवाह आहे. या दोघांची ओळख कोल्हापुरात झाली होती आणि सरिता ही माधवनकडून 'पब्लिक स्पीकिंग' आणि 'पर्सनालिटी डेव्हलपमेंट' चे धडे गिरवत होती. कालांतराने या दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले आणि दोघांनी लग्न केले होते. कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झाले होते. अनेकांचे रोजगार याच काळात हिरावले होते. या काळात अनेकांना काम मिळत नसल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आर.माधवन हा देखील बराच काळ घरात बसून होता. माधवनने कामाशिवाय घरात बसणं हे सरिताला मनाला पटत नव्हतं. एके दिवशी तिने माधवनला सांगितलं की, "तू तमिळ कॉमेडी, तमिळ ॲक्शन, ओटीटी, हिंदी ॲक्शन, इंग्रजी ओटीटी सगळं करतोस. तू घरी बसला आहेस हे पाहून मला आश्चर्य वाटतंय." माधवन याने पुढे म्हटले की सरिताने त्याला घराबाहेर काढले आणि सांगितले, 'बाहेर जा, काहीतरी काम कर आणि पैसे कमवून आण.' 

नक्की वाचा: TVवरच सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी, बिग बॉसमधून दिव्या शिंदेची हकालपट्टी

माधवनला त्याची चूक कळाली

सरिताने जो पवित्रा घेतला होता, त्यामागे कोणताही स्वार्थ नव्हता. माधवनने बिनकामाचं घरी बसणं हे त्याच्या करियरसाठी त्रासदायक ठरू शकतं हे तिला ठाऊक होतं. माधवनने मुलाखतीत सांगितलं की ही घटना होण्यापूर्वी त्याची कामावरील इच्छा उडाली होती. कामापेक्षा त्याला घर अधिक खुणावत होतं. हे माधवनची बायको सरिताने बरोबर ओळखलं होतं. यामुळे तिने कोरोना काळात माधवनला घराबाहेर पडून कामाला पुन्हा सुरूवात करण्यास सांगितलं होतं.  
 

Topics mentioned in this article