Aishwarya Rai Post: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर कपलपैकी एक मानले जाते. सोशल मीडियावर या जोडीची पुन्हा चर्चा होऊ लागलीय. चर्चेमागील कारण अभिषेक बच्चनचा 50वा वाढदिवस आहे. अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने सोशल मीडियावर अभिषेकच्या बालपणीचा एक फोटो शेअर करत त्याला रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्याच्या या पोस्टने चाहत्यांची मने जिंकली. पण कदाचित चुकून अभिनेत्रीकडून एक छोटीशी चूक झाली, ज्यामुळे या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. ऐश्वर्याने अभिषेकच्या बालपणीचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये फक्त त्याचे डोळेच दिसत आहेत आणि फोटोमध्ये त्याचा चेहरा कट झालाय. कदाचित फोटो पोस्ट करताना हे तिच्या हे लक्षात आले नसावे.
ऐश्वर्याच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया | Aishwarya Rai News
ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट करताच नेटकऱ्यांनी कमेंट्स अक्षरशः पाऊस पाडला. एकानं कमेंट केलीय की, हे कोण आहेत भाऊ? फक्त डोळेच दिसत आहेत. दुसऱ्याने लिहिलंय की, मॅडम चुकून तुम्ही अर्धाच फोटो पोस्ट केलाय. आणखी एकाने लिहिलंय की, "परफेक्ट कपल. खरे प्रेम असेच असते. तुम्ही दोघेही नेहमी एकत्र राहा." तर काहींनी "याहून चांगला फोटो मिळाला नाही का?", अशीही विचारणा केलीय. यासह अनेकांनी पोस्टवर अभिषेक बच्चनला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
(नक्की वाचा: Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं?)
ऐश्वर्या-अभिषेकची लव्ह स्टोरी
ऐश्वर्या आणि अभिषेकची प्रेमकहाणी देखील एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणेच आहे. 'गुरु' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीकता वाढली. यानंतर 2007 साली त्यांनी लग्न केलं. त्यांचे लग्न बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लग्नांपैकी एक होते. करिअरच्या बाबतीत सांगायचे झाले तर ऐश्वर्या रायने 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकलाय. 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'जोधा अकबर' यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिनं काम केलंय. तर अभिषेक बच्चनने गुरु, युवा, धूम सीरिज आणि अनेक वेब सीरिजमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world