Saif Ali Khan Attack : मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जाहिरात
Read Time: 1 min

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नक्की वाचा - Prithvik Pratap : नुकतंच लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला बायकोने काढले घराबाहेर, व्हिडीओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे. वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आला. अज्ञात चोराकडून चाकू हल्ला केल्याची माहिती आहे. मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात चोर शिरले होते. त्यातच हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वांद्रे पोलीससुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

चोरी करण्याच्या उद्देशाने काही अज्ञात त्याच्या घरात शिरल्याची माहिती आहे. सुरुवातील चोर लहान मुलांच्या खोलीत गेले असल्याची माहिती आहे. त्यावेळी खोलीतील नर्ससोबत चोरांचा वाद झाला. मुलांना वाचविण्यासाठी सैफ मधे पडला होता. यातच त्याच्यावर चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे.  

Advertisement