Salman Khan Health : सलमान खानला कोणता आजार? महाभयंकर आजार काय आहे? अभिनेत्यानेच दिली होती धक्कादायक माहिती

पिळदार शरीर, चालण्याची विशिष्ट स्टाईल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच अॅटिट्यूड भाईजानच्या चाहत्यांना चांगलाच भावायचा. पण सलमानची ही अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांकडून असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Salman Khan Disease : बॉलीवूडचा दबंग, बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा नुकताच मुंबईतील SRA कार्यालयात गेला होता. यावेळी त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहून 'सलमानला झालंय तरी काय?' असा प्रश्न विचारला जात आहे. दबंग सलमान खानचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आणि फोटो पाहून त्याच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 

पिळदार शरीर, चालण्याची विशिष्ट स्टाईल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच अॅटिट्यूड भाईजानच्या चाहत्यांना चांगलाच भावायचा. पण सलमानची ही अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांकडून असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Advertisement

सलमान खानचा धक्कादायक व्हिडिओ...

सलमान खान नुकताच मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात गेला होता. नवं डेटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटरचं उद्घाटन त्याने केलं. यावेळी सलमान खान नेहमीपेक्षा वेगळाच दिसत होता. त्याचा अवतार पाहून, तो खरंच सलमान खान आहे का त्याचा ड्युप्लिकेट असा प्रश्न क्षणभर मनात निर्माण होईल.  

हा व्हिडीओ व्हायरल होताच सलमानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सलमानने काऊबॉय स्टाईलमधले आपले 5 फोटो शेअर करत हटके कॅप्शनही दिलंय. 'आप लोगों की तबीयत कैसी है?' असा प्रश्न त्याने आपल्या फॅन्सना विचारला आहे. या फोटोंमध्ये सलमान फिट पण काही प्रमाणात बारिक झालेला दिसतोय. पण सलमानचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून त्याला नेमकं काय झालंय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर त्याचं उत्तर खुद्द सलमाननेच काही महिन्यांपूर्वी दिलं होतं. 

नक्की वाचा - Salman Khan : सलमान खानची तब्येत का ढासळतेय? लेटेस्ट Video पाहून चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

सलमान खानला एक असाध्य आजार झाल्याचं त्याने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सांगितलं होतं. सलमानला अनेक न्यूरोलॉजिकल आजार असल्याचं त्याने या कार्यक्रमात सांगितलं होतं. आपल्या ३ आजारांचा उल्लेख करीत त्याने ब्रेन एन्यूरिज्मबद्दल सांगितलं होतं. या आजाराला सुसायडल आजारही म्हटलं जात असल्याचं सलमानने कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं. 

आजाराबाबत सलमान काय म्हणाला होता?

सलमान यावेळी म्हणाला होता की, मी रोज हाडं मोडून घेतो. बरगड्या मोडल्यात आणि ट्रायजेमिनल न्युराल्जियासोबत घेऊन मी काम करतोय. मेंदूमध्ये ॲन्युरिझम आहे, तरीही काम सुरू आहे. आर्टरीयोव्हिनस मॉलफॉर्मेशनसुद्धा आहे, मात्र तरीदेखील काम सुरू आहे. मी ॲक्शन करतो, चालू शकत नाही, तरीही डान्स करतो. माझ्या आयुष्यात हे सर्व सुरू आहे. 

Advertisement
सलमानने स्वत: आपल्या आजाराबाबत माहिती दिली असली तरी हा ट्रायजेमिनल न्युराल्जिया आजार नेमका आहे काय? ते ही जाणून घेऊया

ट्रायजेमिनल न्युराल्जिया नेमका आहे काय?

या आजारामध्ये चेहऱ्याच्या नसांमध्ये वेदना जाणवतात. चेहरा आणि मेंदूला जोडणाऱ्या नसेत दाब वाढतो. चेहऱ्याला सुया टोचल्यासारख्या वेदना होतात. बोलताना किंवा खाताना त्रास होतो. चेहऱ्याला हात लावला तरी वेदना होतात. 2007 मध्ये पहिल्यांदा सलमानला त्रास सुरू झाला होता. अनेक वर्षे वेदना सहन केल्या, उपचारासाठी Gamma Knife Surgery केली.  तज्ज्ञांच्या मते हा संसर्गजन्य आजार नाही. योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण शक्य आहे. तर्क असा लावला जायोत की जुना त्रास बळावल्याने सलमान असा खंगलेला आणि आजारी दिसतोय. 

Advertisement

चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मते, कदाचित हे सलमान खानच्या आगाची चित्रपटाचं प्रमोशन असू शकतं.  जर असं नसेल तर गेल्या ३८ वर्षांच्या काळात त्याने चेहऱ्यावर केलेला मेकअप आणि लाइट्सचा परिणाम असू शकेल असंही ठाकूर यावेळी म्हणाले.  

सलमानला नेहमी एका स्पेशल अॅटिट्यूडमध्ये पाहायची सवय आहे. सलमानचं वय वाढल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवायला लागलंय. सलमानने मुख्य अभिनेत्याच्या भूमिका करणं सोडावं असंही काहीजण म्हणू लागलेत. मास्त शो मस्ट गो ऑन म्हणत सलमान काही हे ऐकायला तयार नाहीये. 
 


Topics mentioned in this article