
Prachi Pisat Vs Sudesh Mhashilkar: मराठी मालिका तसेच सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी अश्लील मेसेज केल्याचा आरोप करत अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. प्राची पिसाटने सुदेश म्हशीलकर यांनी केलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर सुदेश म्हशीलकर यांनी अद्याप मौन बाळगले होते. अखेर आता चार दिवसांनंतर सुदेश म्हशीलकर यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत सुदेश म्हशीलकर?
खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.”
1) “हा मेसेज खरंच मीच केला का?” तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? — याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे, त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप: मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं असं दिसेल. जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं. पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.
( नक्की वाचा- Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)
3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?” माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat' ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.
4 “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?” मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो — कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.
5. “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?” माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.
नक्की वाचा- Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर)
6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?” ‘सेक्सी' म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे — ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येता.. असे स्पष्टीकरण सुदेश म्हशीलकर यांनी दिले आहे.
NCP News : शरद पवार गटात मतभेद? जयंत पाटलांवर तरुण नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world