Apurva Nemlekar Wedding Photos: रात्रीस खेळ चाले फेम अपूर्वा नेमळेकरनं बांधली लग्नगाठ, कोण आहे तनुज गोवळकर?

Apurva Nemlekar Wedding: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि तनुज गोवळकरनं 14 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Apurva Nemlekar Wedding Photos: अभिनेत्री अपूर्वा गोवळकरने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ"
Apurva Nemlekar Instagram

Apurva Nemlekar Wedding: मराठी सिनेसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री 'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेवंता' म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. अपूर्वा आणि तनुज गोवळकरनं गुपचूप पण थाटामाटात लग्नगाठ बांधली आहे. अपूर्वाने 15 फेब्रुवारी रोजी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागील काही दिवसांपासून अपूर्वाच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच अपूर्वा आणि तनुज गोवळकरने लग्न केलं.

कोण आहे तनुज गोवळकर? | Who Is Tanuj Govalkar?

अपूर्वाचा पती तनुज गोवळकर नेमका कोण आहे? तो काय करतो? हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. तनुज हा ग्लॅमर जगतातील नसला तरी तो एका चांगल्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असल्याचं म्हटलं जातं.  

लग्नातील खास लुक आणि पोशाख | Apurva Nemlekar Wedding Look

अपूर्वा आणि तनुजच्या लग्नातील फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या पेहरावावर नजर टाकल्यास त्यात क्लासिक आणि रॉयल लुकचा सुंदर टच पाहायला मिळतोय.

अपूर्वाने लग्नासाठी पारंपरिक नऊवारी पैठणी साडीची निवड केली होती. गडद हिरव्या रंगाच्या या पैठणीवर तिने जड स्वरुपातील सोन्याचे दागिने परिधान केले होते. विशेषतः नथ आणि कपाळावरची चंद्रकोर यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडलीय. तिने पारंपरिक दागिन्यांसह पेशवाई लुक कॅरी केल्याचं दिसतंय.  

Advertisement

(नक्की वाचा: Turu Turu Song: बिग बॉस फेम आयुषच्या 'तुरु-तुरु'ची तुफान हवा! गाण्याने लावलंय वेड; 2 दिवसात 1 मिलियन व्ह्यूज)

तनुजने अपूर्वाच्या लुकला साजेसा असा रॉयल ऑफ-व्हाइट रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. त्यावर त्याने सुंदर नक्षीकाम असलेले उपरणे घेतले होते, यामुळे त्याला राजेशाही लुक मिळाला होता.

Advertisement
अपूर्वा आणि तनुजच्या लग्नामध्ये कोणकोण उपस्थित होते?

मोजक्याच नातेवाईकांच्या आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. अपूर्वाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या नव्या प्रवासाची घोषणा केली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसलाय. अपूर्वाच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या या सुखद वळणामुळे चाहते प्रचंड आनंदात आहेत, नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Advertisement