Prajakta Mali: 'कार्यक्रम माझ्याशिवाय होणार..', कडाडून विरोध अन् वादानंतर अखेर प्राजक्ता माळीचा यु-टर्न

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार होते. मात्र प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला प्रचंड विरोध झाला, त्यानंतर आता अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्याचे सादरीकरण मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार होते. मात्र प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला प्रचंड विरोध झाला, त्यानंतर आता अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कार्यक्रमाला मंदिराच्या माजी विश्वस्त तसेच सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी विरोध करत पोलिसात धाव घेतली होती. तसेच यासंबंधी पुरातत्व विभागाकडेही तक्रार केली होती. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यानंतर पुरातत्व विभागानेही मंदिर समितीला पत्र पाठवले होते.रातत्व विभागाकडून आलेले पत्र तसेच माजी विश्वस्तांच्या आक्षेपानंतरही महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेणार ठाम होते. मात्र आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनेच या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. 

काय म्हणाली प्राजक्ता माळी?

"यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावे असा विचार घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिराकडून फोन आला. आम्ही दरवर्षी मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय संगिताचा कार्यक्रम आयोजित करत असतो. फुलवंतीच्या निमित्ताने आम्हाला समजलं की तुम्हीही भरतनाट्यम नर्तिका आहात, तर यंदा तुम्ही तुमच्या नृत्याचा कार्यक्रम कराल का? असे विचारण्यात आले, त्याला मी तात्काळ होकार दिला होता.

मात्र काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली.  तसेच अवास्तव गर्दीची भिती माझ्या मनात आहे. मंदिराचे प्रांगण त्यामध्ये किती लोक बसतील असे प्रश्न आहे. अशा परिस्थितीत प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून मी या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. माझे सर्व सहकलाकार माझ्याशिवाय नृत्य सादर करतील, अर्थात यामुळे माझ्या आनंदावर विर्जन पडले आहे, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Maharashtra Karnataka dispute : महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद; काय आहे प्रकरण?