
Maharashtra Karnataka Dispute : कर्नाटकमध्ये बस कंडक्टरला झालेल्या मारहाणीनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यानची बससेवा सध्या अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. बेळगावात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसमध्ये चढलेल्या एका महिला प्रवाशाला मराठीत उत्तर न दिल्याने बसच्या कंडक्टरवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर दोन्ही राज्यांमधील बससेवा बंद करावी लागली.
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या बेळगावच्या हद्दीत शुक्रवारी ही घटना घडली. या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. बस कंडक्टरविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे संपूर्ण प्रकरण?
51 वर्षीय बस कंडक्टर महादेवप्पा मल्लप्पा हुक्केरीने सांगितलं की, सुलेभवी गावात आपल्या पुरुष सहकाऱ्यासह बसमध्ये चढलेली एक तरुणी त्याच्याशी मराठीत बोलत होती. मात्र त्यांनी मुलीला सांगितलं की, त्यांना मराठी बोलता येत नाही. त्यामुळे कन्नडमध्ये बोलण्यास सांगितलं. यानंतर कंडक्टर म्हणाला की, मला मराठी येत नसल्याचं सांगितल्यावर मुलगी मला शिवीगाळ करू लागली आणि मराठी शिकण्याचा सल्ला देऊ लागली. यानंतर मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांच्यावर हल्ला केला.
नक्की वाचा - ST Bus Attack: कन्नडिगांची मस्ती! महाराष्ट्राच्या बसवर हल्ला; कन्नड येते का? म्हणत चालकाला काळं फासलं
यानंतर कन्नड समर्थकांनी शनिवारी बेळगाव-बागलकोट मार्गावर चक्काजाम करीत आंदोलन पुकारलं आणि पुतळे जाळले. त्यांनी महाराष्ट्राच्या बसवर कर्नाटक समर्थमार्थ नारे लिहिले. यानंतर तणाव वाढला. त्यामुळे दोन्ही राज्यांतर्गत बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूरातील कर्नाटक राज्यात जाणाऱ्या बस रद्द...
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटीच्या चालकावर काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळं फासले. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस अनिश्चित काळासाठी रद्द केल्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. कोल्हापूर आगारातून दररोज 50 बसेस कर्नाटकमध्ये जात असतात. त्यामुळे आता ही प्रवासी वाहतूक कोलमडणार आहे. कर्नाटकात एसटी कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणींनंतर या एसटी फेऱ्या बंद करण्याचे आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिलेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world