Prajakta Mali on Non-Veg : शरीरासाठी काय उपयुक्त आहे? मांसाहार की शाकाहार? यावर अनेक तर्क-वितर्क काढले जातात. सोशल मीडिया 'तज्ज्ञ' यावर आपआपली मतं देत असतात. शाकाहार-मांसाहाराच्या पुढे जात आता अनेकजण 'व्हिगन' होत असतानाही दिसतात. जनतेच्या आरोग्यासाठी अतिशय जागृत असलेले सोशल मीडिया इन्फ्युएन्सर दररोज नवनव्या गोष्टी सांगत आपल्या ज्ञानात भर पाडत असतात. सल्ले देण्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसह सिनेकलाकारही जनतेच्या आरोग्यासाठी पुढाकार घेताना दिसून येतात. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रेक्षकांना दिलेला एक सल्ला चर्चेचा विषय ठरला आहे. तिने केलेल्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्राजक्ता माळी काय म्हणाली?
एका वृत्त माध्यमाने अभिनेत्री प्राजक्ता माळीची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत प्राजक्ता तिचा आहार-विहार, दैनंदिन आयुष्याविषयी बोलत होती. या मुलाखतीत प्राजक्ता तिचं डाएट सिक्रेट सांगत होती. यावेळी ती म्हणाली,
आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलेल्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. मांसाहार खरंच शरीरासाठी घातक असतो का? मांसाहार हा माणसांसाठी बनलेलाच नाही का? याबाबत आम्ही अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ केयुर ए शेठ यांच्याशी बातचीत केली आणि मांसाहाराचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
नक्की वाचा - Saleel Kulkarni Video : 'नवीन डेटा पॅक दे रे'; सोशल मीडियाचं भयाण वास्तव, प्रत्येकाने ऐकावी अशी कविता
मांसाहार शरीरासाठी खरंच घातक असतो का?
मांसामध्ये प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी 12, जस्त यासारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात. तथापि, जास्त प्रमाणात तेलकट किंवा प्रक्रिया केलेले मांस (उदा. सॉसेज, बेकन) खाल्ले तर हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो. म्हणून, संतुलित आहारात योग्य प्रमाणात मांस खाणे शरीरासाठी हानिकारक नाही.
मांसाहाराचा तुमच्या Nervous System, आचार-विचारावर परिणाम होतो का?
मांसाचा मानवी वर्तनावर किंवा मेंदूच्या कार्यावर थेट नकारात्मक परिणाम होतो याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. मात्र, आहाराचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो - उदाहरणार्थ, ओमेगा-3 फॅटी अॅसिड मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर असतात आणि हे बहुतेक माशांपासून मिळतात. अनेक गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावर, वर्तनावर आणि विचारांवर परिणाम करतात - सामाजिक वातावरण, शिक्षण, संस्कृती, वैयक्तिक अनुभव - फक्त आहारावरच नाही.
मांसाहार हे सडलेला अन्न आहे का?
हे खरे आहे की जेव्हा एखादा सजीव प्राणी मरतो तेव्हा त्याचे शरीर कुजण्यास सुरुवात होते. परंतु बाजारात उपलब्ध असलेले मांस हे ताजे अन्न असते, जे योग्य थंड तापमानात साठवले जाते आणि शिजवून खाल्ले जाते. म्हणून, ते सडलेले आहे असे म्हणणे चुकीचे आहे. स्वयंपाक करताना, उष्णतेमुळे सर्व जीवाणू नष्ट होतात आणि अन्न सुरक्षित असते.
मांसाहार पचवण्यासाठी किती तास लागतात? कोणते शाकाहारी अन्न पचवण्यासाठी जास्त (अगदी किती) तास लागतात?
सामान्यतः मांसाहारी अन्न: शरीराला मांस पूर्णपणे पचवण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. काही ठिकाणी 60-72 तासांचा अंदाज देखील दिला जातो, परंतु तो सामान्यतः लागू होत नाही.
शाकाहारी पदार्थ:
• फळे - 30 मिनिटांत पचतात
• भाज्या - 1 ते 2 तास
• कडधान्ये - 2 ते 3 तास
• कडधान्ये (उदा. राजमा, हरभरा) - 5 ते 6 तास
• सेंद्रिय धान्ये/घन शाकाहारी पदार्थ (उदा. सोया, मशरूम) - 7 तासांपर्यंत
मांसाहारामुळे कोलेस्टेरॉल वाढीचा आणि हार्टअटॅकचा धोका?
आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी राज्यभरात ओळख असलेलं माधवबागचे संस्थापक डॉ. रोहित माधव साने यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितल्यानुसार, मांसाहार खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढतं किंवा हार्टअटॅक येतो असं म्हणणं योग्य नाही. मांसाहार खाणं चुकीचं नाही. मात्र मांस खूप मसाल्यात किंवा तेलात तळून खाल्लं तर त्रास होऊ शकतो. पण तेच नॉनव्हेज शिजवून खाल्लं तर कोलेस्टेरॉल वाढत नाहीत. याशिवाय आपल्या शरीरात विविध प्रकारचे Enzymes असतात जे विविध जेवणाला पचवू शकतात. त्यामुळे मांसाहार शरीरासाठी धोकादायक नाही तर तुम्ही ते मांस कसं शिजवला हे महत्त्वाचं आहे.