Priya Bapat Bold Video : मराठीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापट हिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. प्रियाने मराठीबरोबरच हिंदीमध्येही बरंच काम केलं. ओटीटीवर तर प्रियाची जादू कायम पाहायला मिळते. हिंदी-मराठी ओटीटीवरील वेब सीरिज असो टाइम प्लीज, टाइमपास 2 सारखे चित्रपट. प्रिया आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करते.
2019 मध्ये 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रियाची कणखर भूमिका प्रेक्षकांसमोर आली. यानंतर तिच्या कामाचं कौतुकही झालं. पहिल्यांदाच तिने एक राजकीय व्यक्तिमत्वाची भूमिका साकारली होती. आणि पहिल्यांदाच एका लेझबियन तरुणीच्या भूमिकेत होती. या वेबसीरिजमध्ये तिने काही बोल्ड सीनही दिले होते. याचे काही क्लिप त्यावेळी व्हायरलही झाल्या होत्या.
यासंदर्भातील एक किस्सा प्रिया बापटने आरपार नावाच्या युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत सांगितला आहे. यावेळी प्रियाने सांगितलं की, सिटी ऑफ ड्रिम्सची एक क्लिप त्यावेळी व्हायरल झाली होती. हा सीन तिचा आणि वेबसीरिजमधील तिच्या महिला पार्टनरसोबतचा होता. प्रिया वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली असल्याने तिला या क्लिपबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र कोणीतरी तिला ही क्लिप पाठवली. त्यानंतर असं काही व्हायरल होत असल्याचं तिच्या लक्षात आहे.
यानंतर सर्वात आधी तिने आपल्या वडिलांना फोन केला. आपण या वेबसीरिजमध्ये केलेलं काम आणि दिलेल्या बोल्ड सीनबद्दल सर्व सांगितलं. तुम्हाला कोणा तिसऱ्या व्यक्तीकडून कळण्याआधी मीच सर्व सांगत असल्याचं तिने वडिलांना सांगितलं. यावेळी तिने आई-वडिलांना विचारलं की, मी केलेल्या कामाची तुम्हाला लाच वाटत तर नाही ना? यावर आई-वडिलांनी दिलेलं उत्तर खूप जबरदस्त होतं. ते म्हणाले, हा तुझ्या कामाचा भाग आहे. तू काम म्हणून केलंस. काम म्हणून ते स्वीकारलंस. आम्हाला यात काही गैर वाटत नाही. तू कोणाकडे लक्ष देऊ नको.
त्या बोल्ड सीनबद्दल अनेकदा प्रिया बापटला अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. मात्र प्रियाने अत्यंत प्रामाणिकपणे आणि कणखरपणे त्याला प्रत्युत्तर दिलं.