Priya Marathe Last Post: प्रिया मराठेची नवऱ्यासोबतची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट, पाहून टोळ्यात टचकन येईल पाणी

Priya Marathe Latest News: प्रिया आणि शंतनू यांना मराठी सिनेविश्वातील क्यूट कपल म्हणून ओळखले जात होते. अभिनेत्रीच्या निधनानंतर आता तिची पतीसोबतची खास पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Priya Marathe Last Instagram Post:  मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मनोरंजन विश्व हळहळ व्यक्त करत आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगासारख्या दुर्धर रोगाशी झुंज देताना तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनाने कलाक्षेत्राला मोठा धक्का बसला असून पती शंतनूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रिया आणि शंतनू (Priya Marathe Shantanu Moghe Love Story)  यांना मराठी सिनेविश्वातील क्यूट कपल म्हणून ओळखले जात होते. अभिनेत्रीच्या निधनानंतर आता तिची पतीसोबतची खास पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. 

गेल्या काही काळापासून प्रिया सार्वजनिक जीवनापासून दूर होती. पण तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून (Priya Marathe Instagram Post) ती चाहत्यांच्या संपर्कात होती. तिने ११ ऑगस्ट २०२४ रोजी पती शांतनू मोघेसोबत जयपूरमधील आमेर किल्ल्याच्या सहलीचे काही आनंदी क्षण शेअर केले होते. या पोस्टमध्ये ती खूप आनंदी दिसत होती. किल्ल्याची भव्यता आणि रचनेतील गुंतागुंत पाहून आम्ही थक्क झालो, असं कॅप्शन तिने दिला होता.  प्रियाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ती इतक्या मोठ्या आजाराशी झुंज देत असेल असं कुणालाही वाटलं नसेल. 

प्रिया मराठेच्या या पोस्टवर आता चाहते भावुक प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी अजूनही विश्वास बसत नाही, असं म्हणत प्रियाच्या मृत्यूने धक्का बसल्याचं सांगितले आहे. दरम्यान, प्रिया मराठे यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही माध्यमांत उत्कृष्ट काम केले. हिंदीतील 'पवित्र रिश्ता', 'कसम से', आणि 'बडे अच्छे लगते है' या मालिकांमधील तिची दमदार कामगिरी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्याचप्रमाणे, मराठीतील तिच्या भूमिकांनीही प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. तिच्या निधनामुळे मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीने एक हरहुन्नरी अभिनेत्री कमावली आहे. ,

Priya Marathe: 'हेवा वाटावा असा सुखी संसार तुटला', प्रियाच्या अकाली एक्झिटने दिग्गज कलाकार हळहळले!