Samantha Ruth Prabhu Marriage Photos: अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu News) चाहत्यांना गुडन्यूज दिलीय. 'द फॅमिली मॅन' वेबसीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरबसोबत तिने लग्नगाठ बांधलीय. समांथ-राजने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. आयुष्यातील या खास क्षणाच्या फोटोंना त्यांनी '🤍01.12.2025🤍' असं कॅप्शन दिलंय. लग्नासाठी समांथानं लाल रंगाची सुंदर साडी नेसलीय. मिळालेल्या माहितीनुसार, लिंग भैरवी मंदिरात या दोघांनी सप्तपदी घेतल्या आहेत.
समांथा रुथ प्रभूच्या लग्नाचे फोटो | Samantha Ruth Prabhu Marriage Photos
(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन का देण्यात आले नाही? थरथरत्या आवाजात हेमा मालिनींनी सांगितलं...)
समांथा आणि राजचा सुंदर लुक
समांथा आणि राज (Raj Nidimoru News) दोघांनीही लग्नासाठी अतिशय सुंदर पोशाखाची निवड केली होती. समांथाने लाल रंगाची कांजीवरम साडी नेसलीय. साडीवर तिने गोल्डन ज्वेलरी मॅच केली होती आणि केसांमध्ये गजरा माळलाय. तर राज निदिमोरूने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केलाय, यावर फिकट गुलाबी रंगाचं नेहरू जॅकेट मॅच केलंय. पहिल्या फोटो साखरपुड्याचा फोटो दिसतोय आणि यानंतरच्या फोटोमध्ये लग्नाचे काही विधी पाहायला मिळत आहेत.
कधीपासून राज आणि समांथा आहेत रिलेशनशिपमध्ये?
वर्ष 2024पासून समांथा रुथ प्रभू आणि राज रिलेशनशिपमध्ये आहेत, यानंतर 1 डिसेंबर 2025 रोजी या जोडप्याने तमिळनाडूतील कोइम्बतूर शहरातील ईशा फाउंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात लग्न केले. या दोघांच्या लग्नाच्या फोटोवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
समांथा आणि राज यांनी एकत्र केलंय काम
समांथा आणि राज यांनी 'द फॅमिली मॅन सीझन 2' आणि 'सिटाडेल हनी बनी' या वेबसीरिजमध्ये काम केलंय. या दोन्ही सीरिजचं राजने दिग्दर्शन केलंय. कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर समांथा रुथ प्रभू नेटफ्लिक्सच्या 'रक्त ब्रह्मांड द ब्लडी किंगडम'मध्ये झळकणार आहे, या सीरिजचाही निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरू आहे.
समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यने 2017 रोजी लग्न केलं होतं. यानंतर 2021 रोजी त्यांचा घटस्फोट झाला. तर राज निदिमोरुनं वर्ष 2015 मध्ये श्यामली डेशी लग्न केलं होतं तर 2022मध्ये या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.