जाहिरात

Tejaswini Lonari: 'ही' मराठी अभिनेत्री होणार सदा सरवणकरांची सून, साखरपुडा संपन्न, PHOTO

Actress Tejaswini Lonari Engaged With Samadhan Sarvankar PHOTOS: मुंबईतील सेंट रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा झाला. दोघांच्याही साखरपुड्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Tejaswini Lonari: 'ही' मराठी अभिनेत्री होणार सदा सरवणकरांची सून, साखरपुडा संपन्न, PHOTO

Actress Tejaswini Lonari Engaged With Samadhan Sarvankar: 'तुझेच मी गीत गात आहे', मालिका गाजवत असलेली मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आता शिवसेनेच्या बड्या नेत्याची सून होणार असून नुकताच तिचा साखरपुडा संपन्न झाला. शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार सदा सरवणकर यांच्या थोरल्या मुलासोबत तेजस्विनी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. (Actress Tejaswini Lonari Engagement) 

 तेजस्विनी लोणारी होणार शिवसेनेच्या बड्या नेत्याची सून

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांचा साखरपुडा पार पडला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत  मुंबईतील सेंट रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा झाला. दोघांच्याही साखरपुड्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

या साखरपुड्याच्या सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता सिद्धार्थ जाधव, पूजा सावंत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील अभिजीत खांडकेकर पत्नी सुखदा खांडकेकर, हार्दिक जोशी पत्नी अक्षया देवधर आदी कलाकार यावेळी  उपस्थित होते. सर्वांनी  अभिनेत्रीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

कोण आहेत समाधान सरवणकर?

दरम्यान, समाधान सरवणकर हे माजी नगरसेवक आहेत, सध्या ते शिवसेनेचे नेते म्हणून सक्रिया आहेत. दुसरीकडे अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने छापा काटा, चित्तोड की राणी पद्मिनी का जोहूर, गुलदस्ता, दोघात तिसरा आता सगळं विसरा, अफलातून अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती मराठी बिग बॉसमध्येही दिसली होती. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतही तिने भूमिका साकारली आहे. 

तेजस्विनी लोणारीने 'छापा काटा', 'वॉण्टेड बायको नंबर वन', 'चित्तोड की राणी पद्मिनी का जोहूर', 'गुलदस्ता', 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा', 'अफलातून', 'कलावती' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.तसेच अलिकडेच ती 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेमध्ये दिसली. याशिवाय 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com