Bollywood News Today : बॉलिवूडमध्ये नातं जुळणं आणि ते तुटणं ही आता खूपच सामान्य गोष्ट झाली आहे. पण काही कलाकार असेही असतात ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याला त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते. असाच एक अभिनेता आहे, ज्याचा सुपरहिट स्टार्सच्या यादीत समावेश होत नाही.पण त्याचे प्रेमसंबंध नेहमीच चर्चेत राहिलं आहे. 40 वर्षांचा टप्पा ओलांडलेल्या या अभिनेत्याचे नाव अनेक नामांकित अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले आहे.विशेष म्हणजे, देओल कुटुंबातील एका मुलीसोबत त्याचं खास नातं असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण तो अभिनेता आहे तरी कोण?असा प्रश्न अनेकांना पडला असेलच..जाणून घेऊयात या अभिनेत्याबाबत सविस्तर माहिती..
आदित्य रॉय कपूर आणि त्याचे अफेअर
गेल्या काही दिवसांपासून आदित्य रॉय कपूरचे नाव मॉडेल जॉर्जिना डिसिल्वासोबत जोडले जात आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये एक मुलीच्या हाताचा फोटो शेअर करण्यात आला होता. यात असलेल्या नेल पॉलिशचा रंग जॉर्जिनाच्या पोस्टशी मिळता जुळता होता. ही पोस्ट समोर येताच विविध चर्चांना उधाण आलं होतं. दोघांनीही एकमेकांना फॉलो करणं आणि सोशल मीडियावरील त्यांचा परस्पर संवाद, यामुळे या अफवांना आणखी पेव फुटला. पण आदित्य रॉय कपूरने तो सिंगल असल्याचं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
अनन्या पांडेसोबतचं नातं
यापूर्वी आदित्य रॉय कपूरचं नाव अनन्या पांडेसोबतही बराच काळ जोडलं गेलं होतं. दोघेही अनेकदा एकत्रित स्पॉट झाले होते. सुट्ट्यांपासून ते इव्हेंट्सपर्यंत ते एकत्रित स्पॉट झाल्याचं पाहायला मिळालं.त्यांनी कधीही त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे घोषणा केली नाही. पण काही दिवसानंतर दोघे एकमेकांपासून दूर झाले, अशा बातम्या समोर आल्या होत्या.
नक्की वाचा >> Pune News : प्रवाशांसाठी खुशखबर! 2300 रुपयांत पुणे ते सिंधुदुर्ग प्रवास, दररोज जातात या फ्लाईट्स, पाहा VIDEO
श्रद्धा कपूरसोबत अफेअर
आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरची ऑन स्क्रिन केमेस्ट्री सर्वात चर्चेचा विषय होती. आशिकी 2 चित्रपटाच्या यशानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा अधिक रंगू लागल्या.पण या नात्याबाबतही अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नव्हती.
अहाना देओलला डेट केल्याची चर्चा
करिअरच्या सुरुवातीच्या काळात आदित्य अहाना देओल यांच्यात जवळीक वाढल्याचं बोललं जात होतं. त्या काळात अहाना एका चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्याची चर्चा होती.याशिवाय, एमटीव्हीवर काम करत असताना त्याचं नाव रिया चक्रवर्तीसोबतही जोडलं गेलं होतं.
नक्की वाचा >> मुंबईच्या पार्ले-जी फॅक्टरीची शेवटची आठवण, पर्यावरण विभागाने घेतला सर्वात मोठा निर्णय, त्या ठिकाणी काय होणार?
मॉडेल दीवा धवनसोबत नातं
याशिवाय, मॉडेल दीवा धवन आणि एका विदेशी मेकअप आर्टिस्टसोबतही आदित्य रॉय कपूरच्या लिंकअपच्या बातम्या समोर आल्या. मात्र, या नात्यांवर कधीही शिक्कामोर्तब झालं नाही. एक हिट सोलो फिल्म दिलेल्या या अभिनेत्याच्या कामापेक्षा त्याच्या लव्ह स्टोरीजच जास्त चर्चेत राहिल्या आहेत.