जाहिरात

Pune News : प्रवाशांसाठी खुशखबर! 2300 रुपयांत पुणे ते सिंधुदुर्ग प्रवास, दररोज जातात या फ्लाईट्स, पाहा VIDEO 

पुण्यातील हवाई प्रवाशांना गोवा आणि सिंधुदुर्गसाठी थेट उड्डाणांची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोकण भागातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पुणे ते सिंधुदुर्ग विमानसेवा फक्त 2300 रुपयांमध्ये सुरु झाल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

Pune News : प्रवाशांसाठी खुशखबर! 2300 रुपयांत पुणे ते सिंधुदुर्ग प्रवास, दररोज जातात या फ्लाईट्स, पाहा VIDEO 
Pune To Sindhudurg Flight
पुणे:

Pune To Sindhudurg Flight Ticket Fare :  पुण्यातील हवाई प्रवाशांना गोवा आणि सिंधुदुर्गसाठी थेट उड्डाणांची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोकण भागातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पुणे ते सिंधुदुर्ग विमानसेवा फक्त 2300 रुपयांमध्ये सुरु झाल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. @Siddhantpatil नावाच्या यूजरने पुणे ते सिंधुदुर्ग विमानसेवेचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, प्रवाशांना पुणे ते सिंधुदुर्ग विमानसेवा 2300 रुपयांत करणं शक्य आहे. एका प्रवाशाने विमानतळावर व्हिडीओ बनवून प्रवाशांना ही खुशखबर दिली आहे. 

फ्लाय 91 या विमान कंपनीने केली होती मोठी घोषणा

रिपोर्टनुसार, फ्लाय 91 या विमान कंपनीने या नव्या मार्गांच्या सुरुवातीची घोषणा केली असून ही उड्डाणे शनिवार आणि रविवारी उपलब्ध असतील.नव्या सुरू केलेल्या या उड्डाणांमुळे पुणेकर जवळपास एका तासात सिंधुदुर्ग किंवा गोव्यात पोहोचू शकतील. पुणे–सिंधुदुर्ग मार्गासाठी, IC 5302 ही फ्लाइट पुणे विमानतळावरून सकाळी 8:05 वाजता उड्डाण घेते आणि सिंधुदुर्ग विमानतळावर सकाळी 9:10 वाजता उतरते. 

नक्की वाचा >> मुंबईच्या पार्ले-जी फॅक्टरीची शेवटची आठवण, पर्यावरण विभागाने घेतला सर्वात मोठा निर्णय, त्या ठिकाणी काय होणार?

परतीची IC 5303 फ्लाइट सिंधुदुर्गवरून सकाळी 9:30 वाजता निघते आणि सकाळी 10:35 वाजता पुण्यात पोहोचते.गोवा जाणाऱ्या प्रवाशांसाठी,IC 1376 ही फ्लाइट गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 6:35 वाजता उड्डाण करते आणि सकाळी 7:40 वाजता पुण्यात पोहोचते.परतीची IC 1375 ही फ्लाइट पुण्यातून सकाळी 10:55 वाजता निघेल आणि दुपारी 12:10 वाजता गोव्यात लँड होते,अशी माहिती आहे.

नक्की वाचा >>  Pune News: हापूस आंब्याच्या पेटीचा दर फुटला, किंमत ऐकून थंडीतही फुटेल घाम

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com