Deepika Padukone : स्पिरीट चित्रपटानंतर कल्की 2 मधूनही दीपिका पादुकोनला डच्चू? कमबॅकमध्ये अडचणी, काय आहे सत्य? 

जाहिरात
Read Time: 2 mins

सिंघम अगेननंतर दीपिका पादुकोन आता चित्रपटात पदार्पण करण्यासाठी तयार आहे. आई झाल्यानंतर दीपिकाने आपली लेक दुआसाठी चित्रपट क्षेत्रातून काही वेळासाठी ब्रेक घेतला होता. आता बऱ्याच अवधीनंतर दीपिका मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखविण्यास तयार आहे. मात्र काही दिवसांपूर्वी संदीप रेड्डी वांगा याच्या चित्रपटातून दीपिका पादुकोनला डच्चू दिल्याचं चर्चेत आलं होतं. यासोबत दीपिका आपला दुसरा चित्रपट कल्की २ मधूनही बाहेर झाल्याचं सांगितलं जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आतापर्यंत दीपिकाने आपल्या चित्रपटातून चाहत्यांवर गारूड केलं आहे. आताही तिच्या हातात अनेक  जबरदस्त चित्रपट होते. ज्यामध्ये संदीप रेड्डी वांगाचा चित्रपट स्पिरीटचाही समावेश होता. मात्र चित्रपटादरम्यान दीपिकाने आठ तास काम करणार असल्याचं सांगितलं. ज्यावर दोघांमध्ये पटलं नाही आणि तिला चित्रपट सोडावा लागला. यानंतर, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चित्रपटाची स्क्रिप्ट लीक झाल्याबद्दल अप्रत्यक्षपणे अभिनेत्रीवर निशाणा साधला. आता सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहे. 'कल्की २' चे निर्माते दीपिकाला चित्रपटातून बाहेर करण्याच्या विचारात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

नक्की वाचा - 'जावेद अख्तर यांना भारतामध्ये कुणी घर देत नाही,' पाकिस्तानी कलाकाराचा दावा! गीतकार म्हणाले मी आणि शबाना...

कल्की २ मध्ये महत्त्वाची भूमिका...
बॉलिवूड हंगामाने सूत्राच्या हवाल्याने या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे. चित्रपटाशी संबंधित एका सूत्रांनी सांगितलं की, कल्की २ चे निर्माते असा कोणताही विचार करीत नाही. दीपिका या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. कल्की २ या चित्रपटात दीपिकाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं शूटिंग २०२६ पासून सुरू होणार आहे. दीपिका पादुकाने शाहरुख खानचा चित्रपट किंगमध्येही दिसणार आहे.   

Advertisement