Aaradhya bachchan school fees: बॉलीवूडमधील कलाकार आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. ते त्यांच्या खासगी आयुश्याबाबत जाणून घेण्यासाठी नेहमीच अतूर असतात. ते काय करतात? ते कुठे फिरतात? त्यांना काय आवडतं? ते घरात असताना एकमेकांशी कसे वागतात? असे प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडता. बरं या शिवाय त्यांची मुलं काय करतात हाही चाहत्यांना पडलेला प्रश्न असतो. सेलिब्रेटींची मुलं परदेशात शिकतात का? शिकत असतील तर कुठे? तीथे फी किती असते असे प्रश्नही त्यांना सतावत असतात. त्या पैकीच एक आहे अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लेक आराध्य बच्चन. तिच्या बद्दल आज आपण काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.
ऐश्वर्याची लेक आराध्या नेहमी चर्चेत
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या ही नेहमीच चर्चेत असते. जे काही मोजके स्टारकिड्स चर्चेत असतात त्या पैकी आराध्या एक आहे. आराध्या बऱ्याचदा तिच्या आईबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, तसेच छोट्या-मोठ्या समारंभांना हजेरी लावताना दिसते. त्यामुळे तिची चर्चा होते. बच्चन कुटुंबा भोवती जसं एक वलय आहे तसचं वलय खूप लहान वयात आराध्या भोवती ही आहे. ही आराध्या कोणत्या शाळेत शिकते याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
शाळेची फी ऐकून व्हाल थक्क!
आराध्या मुंबईत शिकते की परदेशात? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. शिवाय ती कितवीला आहे हा ही बच्चन फॅन्सला पडलेला प्रश्न आहे. तर आराध्या सध्या मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आराध्याच्या शाळेची फी खूपच जास्त आहे. नर्सरी ते 7 वी पर्यंतच्या वर्गासाठी या शाळेची महिन्याची फी अंदाजे 1.70 लाख रुपये आहे.तर 8 वी आणि त्यापुढील उच्च माध्यमिक वर्गांसाठी (हायस्कूल) ही मासिक फी तब्बल 4.5 लाख रुपये इतकी आहे. ही महिन्याची फी आहे.
ऐश्वर्या-आराध्याचे खास नाते
ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यातील बॉण्डिंगबद्दल नेहमीच बोलले जाते. अनेक मुलाखतींमध्ये अभिषेक बच्चनने हे स्पष्ट केले आहे की, आराध्याच्या संगोपनाचे संपूर्ण श्रेय तो ऐश्वर्याला देतो. तसेच, पत्नी ऐश्वर्या आणि लेक आराध्या यांच्या पाठिंब्यामुळेच आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो, असेही अभिषेकने नमूद केले होते. आराध्याचे महागडे शिक्षण आणि ऐश्वर्याचे समर्पित पालकत्व यामुळे बच्चन कुटुंबातील या स्टारकिडचे आयुष्य नेहमीच चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरते.