अजय देवगणला व्हिस्कीचं वेड, 8,622 बॉटल्स विकून मिळवले बक्कळ पैसे , ब्रॅण्ड अन् किंमतीची जगभरात चर्चा

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण एक जबरदस्त अभिनेते तर आहेत, पण त्याने एक जबरदस्त उद्योगपती म्हणूनही छाप टाकली आहे. कारण..

जाहिरात
Read Time: 2 mins
Ajay Devgan Whiskey Brand Name
मुंबई:

Ajay Devgan Company Whiskey Production : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण एक जबरदस्त अभिनेते तर आहेत, पण त्याने एक जबरदस्त उद्योगपती म्हणूनही छाप टाकली आहे.कारण अजयने नुकतच सुरु केलेल्या एका उद्योगधंद्याचा रिझल्ट 4 महिन्यातच समोर आला आहे.वर्ष 2025 मध्ये अजय देवगण यांनी सिंगल मॉल्ट व्हिस्कीचा एक ब्रॅण्ड लॉन्च केला होता.'द ग्लेन जर्नीज'(The GlenJourneys)रिपोर्ट्सनुसार, लोकांना अजयच्या ब्रण्डची व्हिस्की खूप पसंत केली आहे.चार महिन्यांतच या व्हिस्कीची प्रचंड विक्री झाली आहे.यामुळे देवगणच्या कंपनीला कोट्यवधींची कमाई झाली आहे. 

कंपनीला झाला कोट्यवधींचा फायदा

कंपनीने म्हटलंय की, प्रीमियम ब्रॅण्डने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये मार्केटमध्ये लॉन्च झाल्यापासून फक्त 4 महिन्यात 8,622+ बॉटल्स विक्री केल्या आहेत.ज्यामुळे कंपनीचं 4 महिन्याचं टोटल टर्नओव्हर 4.14 कोटींचं आहे. याची ओपनिंग सर्वात आधी महाराष्ट्रात झाली होती. त्यानंतर याचे आऊटलेट्स गोवा,उत्तराखंड, उत्तरप्रदेशमध्ये पोहोचले.वर्ष 2026 मध्ये ते दिल्ली,हरियाणापर्यंत पाठवण्यात आले. 

नक्की वाचा >> Akola News : अकोल्यातील मजुराच्या मुलीचं स्वप्न साकार, पहाटे 5 वाजता रनिंग, व्यायाम अन्..देशभरात होतंय कौतुक

‘द ग्लेन जर्नीज'चे देशभरात 6 राज्यांमध्ये 437 आऊटलेट्स आहेत. आता कंपनीने आणखी 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातही याचे स्टोअर ओपन करण्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी अर्ज दिले आहेत.  यामध्ये पंजाब,पाँडेचेरी,राजस्थान आणि चंदीगढ सामील आहे. याशिवाय देशातील अनेक मोठ्या एअरपोर्टच्या ड्युटी फ्री सेक्शनमध्येही ‘द ग्लेन जर्नीज'ची व्हिस्की उपलब्ध आहे. हा ब्रॅण्ड आता एक्स्पोर्टच्या माध्यमातून जगभरात विस्तार करण्याच्या विचाराधीन आहे.

नक्की वाचा >> Pune News : पुणे हादरलं! फक्त 20 रुपयांसाठी केलं खतरनाक कृत्य, एकाच दिवशी 2 भयानक घटना घडल्याने नागरिक भयभीत

अजय देवगण व्हिस्की पिण्याचं व्यसन

हा उद्योगधंदा सुरू करण्यापूर्वी अजय देवगणने एका मुलाखतीत म्हटलंय की, त्यांना व्हिस्की प्यायला आवडते.विशेषत: सिंगल मॉल्ट व्हिस्की फेव्हरेट आहे. फिल्मबाबत बोलायचं झालं तर, अजय रकुल प्रीत आणि आर माधवन सोबत ‘दे दे प्यार दे 2'मध्ये झळकले होते.ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केलं होतं.आता अजय ‘दृश्यम 3'मध्ये झळकणार आहे.

Advertisement