सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Crime News Today : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोन धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. फक्त 20 रुपयांसाठी मित्रानेच मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले.मित्रानेच मित्राच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना पिंपरी परिसरात घडली आहे. रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. सत्यजित उर्फ सोन्या कांबळे असं आरोपीचं नाव असून तो फरार होता. पोलिसांनी आता लातूरमधून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र गायकवाड आणि सत्यजित कांबळे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.'माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत',असं म्हणत सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण बैलबाजार परिसरात संतापजनक प्रकार, भावाने लहान बहिणींना शाळेत नेलं, पण नंतर घडलं भयंकर
पोलिसांनी फरार आरोपीला लातूरमध्ये ठोकल्या बेड्या
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान,हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लातूर येथे रवाना झाले आणि अवघ्या काही तासांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येच्या प्रयत्नाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की वाचा >> रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या लग्नात ना पंडित, ना फेरे..देशभरात होतेय लग्नाची चर्चा, काय आहे खास कारण?
पिंपरी-चिंचवडमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग ची घटना घडली.दिघी येथे बाफना ज्वेलर्स चन्होली फाट्यासमोर दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यानी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढलाय.ही सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली.महिलेच्या गळ्यातील जवळपास अडीच तोळ्याची सोन्याची गंठण मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली.दुचाकी वाहन चालवणाऱ्या इसमाने पांढरा शर्ट हेल्मेट, मागे बसलेल्या इसमाने लालसर रंगाचे शर्ट व तोंडाला रुमाल बांधलेला होता. हे सर्व दृष्य सीसीटीव्ही कैद झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world