एक निर्णय अन् करिअरला धक्का, न्यूड फोटोचा वाद; अक्षय खन्नाच्या सख्ख्या भावाचं संघर्षमय आयुष्य, पाहा 7 फोटो

Akshaye Kanna Elder Brother 7 Photos: अक्षय खन्नाबद्दल तुम्हाला बरंच काही माहिती झालं असेल. अक्षय प्रमाणेच त्याचा भाऊदेखील अनेक चर्चा आणि वाद आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akshaye Kanna Elder Brother 7 Photos
Social Media

Akshaye Khanna Elder Brother: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर केवळ एकच नाव चर्चेत आहे. अक्षय खन्ना... या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणवीर सिंह आहे, मात्र व्हिलनच्या भूमिकेतील अक्षय खन्नाची सर्वाधिक चर्चा आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात निगेटिव्ह रोलमध्ये आहेत. ज्याने वयाच्या १३-१४ व्या वर्षी गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवलं आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही. अक्षय खन्नांनी या भूमिकेसाठी आपल्या लुक्सवर काम केलं. याशिवाय त्याची डान्स स्टेपही प्रचंड व्हायरल झाली आहे. अक्षय खन्नाची चर्चा सुरू असताना त्याच्या कुटुंबाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

अक्षय खन्नाचा मोठा भाऊ कोण आहे? 

अक्षय खन्नाच्या मोठ्या भावाचं नाव राहुल खन्ना. राहुलदेखील अक्षय प्रमाणे अभिनेता आहे. याव्यतिरिक्त त्याने व्हिडिओ जॉकी, मॉडेल आणि लेखक म्हणूनही काम केलं आहे. राहुल हा विनोद खन्नांचा मोठा मुलगा आणि अक्षय लहान. राहुल खन्नाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९९ मध्ये अर्थ चित्रपटातून केली होती. यासाठी त्याला चित्रपट क्षेत्रात पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर २०२३ मध्ये 'लॉस्ट' चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती. टीव्हीमधील त्याच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास १९९४ ते १९९८ पर्यंत तो MTV Asia मध्ये व्हिजे म्हणून काम करीत होता. 

नक्की वाचा - करिश्मा कपूर अन् अक्षय खन्नाचे प्रेमसंबंध; बहीण करिना झाली होती अक्षयसाठी वेडीपिशी, 'तो' व्हिडिओ व्हायरल

न्यूड फोटोशूटमुळे वादात अडकला होता...

राहुल खन्नाने २०२२ मध्ये एक न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. हा फोटो खूप चर्चेत होता. मलायका अरोरा, नेहा धुपिया, दीया मिर्झासह अनेक टॉप अभिनेत्रींनी यावर कमेंट केली होती. 

Advertisement

एक चुकीचा निर्णय अन् करिअरला धक्का...

राहुल खन्ना अमेरिकेत अभिनयाचं शिक्षण घेत होते, त्या काळात त्यांना एमटीव्ही एशियासोबत व्हिजेचं काम सुरू केलं. यानंतर त्यांना अर्थ चित्रपटाची ऑफर आली. दीपा मेहता निर्मित या चित्रपटाची कहाणी आणि भूमिका राहुलला आवडली आणि त्याने विचार न करता होकार दिला. हा त्यांच्या करिअरमधील चुकीचा निर्णय असल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. त्यामुळे सर्व लाइमलाइट अमिर खानला मिळाली आणि राहुल खन्ना साइडहिरो राहिले. करिअरच्या सुरुवातीलात त्यांना मोठा धक्का बसला होता.

Advertisement
Advertisement