akshaye khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना 'धुरंधर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील डान्स एन्ट्रीच्या Fa9la गाण्याने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान करिना कपूरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 'हिमालय पुत्र' चित्रपट पाहिल्यानंतर करिना कपूर अक्षयसाठी वेडी झाली होती. आणि तो हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचंही म्हटलं होतं. २००४ मध्ये हलचल चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करिनाने अक्षयसोबत काम करायला खूप मजा आल्याचं सांगितलं. ती म्हणाली, मी हिमालय पुत्र सिनेमा कमीत कमी २० वेळा पाहिला आहे. त्यावेळी मी शाळेत होते आणि त्याकाळी अक्षय खन्ना लेटेस्ट हार्टथ्रोब होते. मुली त्याच्या मागे वेडापिशा होत्या आणि त्या मुलींपैकी मी एक होते.
हॉलिवूडला जाण्यासाठी योग्य व्यक्ती...
करिना कपूर पुढे म्हणाली, तो खूप क्यूट आणि चांगला माणूस आहे. तो खूप चांगला अभिनेता आहे. हॉलिवूडला जाण्यासाठी तो योग्य व्यक्ती आहे. कोणत्याही चित्रपटातील त्याचा परफॉर्मेन्स जबरदस्त असतो. करिना कपूरची बहीण करिष्मा कपूरसोबत अक्षय खन्ना नातेसंबंधात असल्याची चर्चा होती. दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र काही कारणास्तव हे शक्य झालं नाही. विशेष म्हणजे करिना कपूरच्या लग्नात अक्षय खन्ना सामील झाला होता. त्यांचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Kareena kapoor about akshay khanna in 2004
byu/TheLastDetective inBollyBlindsNGossip
'हलचल' चित्रपटाबद्दल...
हलचल चित्रपट रिमेक होता. प्रियदर्शन दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडी १९९१ ची मल्यालम चित्रपट गॉडफादर चित्रपटाचं रुपांतर म्हणजे हलचल. या चित्रपटात अक्षय खन्ना, करिना कपूर, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, अमरीश पुरी, परेश रावल, अरबाज खान, शक्ती कपूर, फरहा नाज आणि लक्ष्मी सारख्या कलाकारांनी काम केलंय. या चित्रपटाची कहाणी वैर असणाऱ्या दोन कुटुंबाची आहे.