Vinod Khanna's Second Wife Kavita Khanna Opens Up on Step-Son Akshaye Khanna: ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी त्यांचा सावत्र मुलगा आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्यासोबतच्या नात्यावर प्रथमच स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' चित्रपटाला मिळत असलेल्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर पुन्हा एकदा चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर, अक्षय खन्ना तसंच विनोद खन्ना यांच्याशी संबंधित जुन्या मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या चर्चांदरम्यान, पत्रकार लवीना टंडन यांच्या यूट्यूब चॅनेल 'लवीना टंडन प्रोडक्शन्स'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत कविता खन्ना यांनी अक्षय खन्नासोबतच्या त्यांच्या बॉण्डिंगबद्दल माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कधीही अक्षय खन्नाची 'आई' बनण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या मते, अक्षय खन्नाला आधीच एक खूप चांगली आई (गीतांजली खन्ना) मिळाली होती आणि त्यांनी नेहमीच या नात्याचा आदर केला. तसेच, कविता खन्ना यांनी सांगितले की, त्यांचे आणि विनोद खन्ना यांचे नाते प्रेम आणि आध्यात्मिक जवळीक यावर आधारित होते. त्यांच्यात उत्तम बंध होता.
( नक्की वाचा : Dhurandhar सिनेमातील Washma Butt प्रसंगाची इंटरनेटवर तुफान चर्चा, तुम्हाला समजला का अर्थ? )
विनोद खन्नांनी ओशोंच्या आश्रमात जाण्याचा निर्णय का घेतला?
कविता खन्ना यांनी यावेळी विनोद खन्ना यांनी संन्यास घेण्याच्या निर्णयाबद्दलही चर्चा केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या आईच्या निधनानंतर विनोद खन्ना जीवनातील गहन प्रश्नांनी ग्रासले होते, ज्यामुळे त्यांनी ओशो यांच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. कविता खन्ना यांच्या दाव्यानुसार, विनोद खन्ना कोणत्याही राजकीय कारकिर्दीच्या नियोजनात नव्हते आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची बरीच कामे अपूर्ण राहिली होती.
अक्षय खन्नाचा जुना अनुभव
यापूर्वी अक्षय खन्ना यांनीही वडिलांच्या संन्यासाच्या निर्णयावर भाष्य केले होते. एका जुन्या मुलाखतीत अक्षय खन्ना म्हणाला होता की, संन्यास म्हणजे केवळ कुटुंब सोडणे नव्हे, तर संपूर्ण आयुष्य त्यागणे होय. 5 वर्षांचe असताना त्यांना वडिलांचा हा निर्णय समजला नव्हता, पण आता त्यांना जाणीव आहे की, एखाद्या व्यक्तीच्या आत खूप मोठा आणि खोलवर बदल झाल्याशिवाय तो असे पाऊल उचलू शकत नाही.