जाहिरात

कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या

Who was Rehman Dakait: धुरंधर सिनेमात दिसणाऱ्या या खलनायकापेक्षा खरा रहमान डकैत कितीतरी जास्त क्रूर आणि भयानक होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या
Dhurandhar : धुरंधरमध्ये अक्षय खन्नानं साकारलीय गँगस्टरची भूमिका
मुंबई:

Who was Rehman Dakait:  सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत असलेल्या 'धुरंधर' या स्पाय थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत आहे. पण, सर्वत्र चर्चा आणि कौतुक हे अक्षय खन्नाच्या अभिनयाचे होत आहे.या चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान बलूच, ऊर्फ रहमान डकैत या क्रूर गुंडाची भूमिका साकारली आहे. पडद्यावर दिसणाऱ्या या खलनायकापेक्षा खरा रहमान डकैत कितीतरी जास्त क्रूर आणि भयानक होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

'धुरंधर'ची कथा आणि रहमानचे पात्र

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट हा काही सत्य घटनांवर आधारित आहे. 2000 च्या दशकाच्या अखेरीस, पाकिस्तानमधील कराचीमधील ल्यारी नावाचा भाग हा टोळीयुद्धाचे मुख्य केंद्र होता. याच भागात, भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरुद्ध केलेल्या लढ्याची अर्ध-काल्पनिक कथा या चित्रपटातून मांडली आहे.

अक्षय खन्नाने साकारलेला रहमान हा ल्यारीवर राज्य करणाऱ्या गुंड टोळीचा प्रमुख असतो. त्याचा चुलत भाऊ आणि सेकंड-इन-कमांड उझैर बलूच (दानिश पंडोर) याच्या मदतीने तो संपूर्ण भागावर दहशत निर्माण करतो. चित्रपटात रणवीर सिंगने 'हमजा' नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका केली आहे, जो रहमानच्या टोळीत सामील होऊन त्यांना संपवण्याचे आणि आयएसआय (ISI) सोबतच्या त्यांच्या व्यवहारांची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना देण्याचे काम करतो.

( नक्की वाचा : Smriti Mandhana: स्मृती मानधनानं लग्न मोडल्यानंतर, 'बेस्ट फ्रेंड' Jemimah ची गूढ पोस्ट चर्चेत,अर्थ माहिती आहे? )

खरा 'रहमान डकैत' कोण होता?

अक्षय खन्नाने ज्याच्या भूमिकेने  पडदा गाजवला, त्या खऱ्या रहमान डकैतचे पूर्ण नाव सरदार अब्दुल रहमान बलूच होते. त्याचा जन्म 1975मध्ये झाला. ल्यारीमध्ये त्याने लहान वयातच ड्रग्ज विकायला सुरुवात केली. तो अवघ्या 13 वर्षांचा असताना त्याने कथितरित्या पहिल्यांदा हिंसक कृत्य केले, ज्यात त्याने एका व्यक्तीला चाकू मारले होते.

क्रूरतेचा कळस

एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील एका अहवालानुसार, रहमान  19 वर्षांचा होता, तेव्हा त्याने त्याच्या जन्मदात्या आईची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह पंख्याला लटकवले. 'धुरंधर' चित्रपटातील एका महत्त्वाच्या दृश्यात हे कृत्य काही प्रमाणात कलात्मक बदल करून दाखवले आहे.

कापलेल्या  शिरांनी फुटबॉल खेळणारा गुंड'

1990 च्या दशकाच्या अखेरीस रहमान हाजी लालूच्या टोळीत सामील झाला.2001 मध्ये लालूच्या अटकेनंतर रहमानने या टोळीची सूत्रे हाती घेतली. पुढची सुमारे 8 वर्षे रहमानने उझैर आणि बाबा लाडला यांच्या साथीने ल्यारीला आपला बालेकिल्ला बनवले. डेली गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार, लाडला आणि बलूच हे रहमानच्या आदेशानुसार आपल्या शत्रूंना मारून त्यांची कापलेली मुंडकी (शिरे) घेऊन फुटबॉल खेळायचे, जेणेकरून त्यांची दहशत कायम राहील.

रहमानचा शेवट कसा झाला?

ऑगस्ट 2009 मध्ये,ल्यारी टोळीवर कराची पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबारात रहमान डकैत ठार झाला. तेव्हा त्याचे वय केवळ 34 वर्षे होते. त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा चुलत भाऊ उझैर याने त्याच्या टोळीची सूत्रं स्विकारली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com