(Akshaye Khanna) सध्या अक्षय खन्नाचं 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटातील सादरीकरणाचं कौतुक केलं जात आहे. आदित्य धर याने निर्मिती केलेल्या धुरंधरने बॉक्स ऑफिसवर ९ दिवसात ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर वर्ल्डवाइड कमाई 400 कोटींच्या पार गेली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. यादरम्यान सोशल मीडियावर अक्षय खन्नाच्या सावत्र भावाचीही चर्चा आहे. विनोद खन्नांचा सर्वात लहान मुलगा साक्षी खन्नाचे (Sakshi Khanna) फोटो व्हायरल होत आहेत. ज्याला पाहून विनोद खन्नाची आठवण काढली जात आहे.
साक्षी खन्ना बॉलीवुड सुपरस्टार विनोद खन्ना आणि त्यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांचा सर्वात लहान मुलगा. त्याचा जन्म १२ मे रोजी १९९१ मध्ये मुंबईत झाला. तो अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना याचा लहान भाऊ असून श्रद्धा खन्नाचा भाऊ आहे.
साक्षीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर साक्षीने अनेक प्रोडक्शन्स संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी आणि मिलन लूथरियाच्या वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारामध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलं. यानंतर त्यांनी अभिनयच्या क्षेत्रात लहान लहान प्रोजेक्ट केले.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, साक्षी मिलन लूथरियाच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अद्याप प्रोजेक्ट फाइनल झालेला नाही. डायरेक्टर साक्षीबाबत बोलताना म्हणाले, साक्षी अत्यंत हुशार आहे. चित्रपटातील भूमिकाही अवघड आहे. त्यामुळे पुढील काही महिने त्याला होमवर्क करावा लागेल.
याशिवाय साक्षी खन्नाने आपलं एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. सोशल मीडियावर तो बराच सक्रिय आहे आणि स्वत:चे फोटो नियमित शेअर करतो. चाहते त्याच्या लुक्सवर फिदा आहे, साक्षीला विनोद खन्नाची कार्बन कॉपी म्हणतात.