'साँग्स ऑफ पॅराडाइज' हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पद्मश्री पुरस्कार विजेत्या राज बेगम यांच्या प्रवासावर आधारित आहे. ज्यात सोनी राजदान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, सोनी राजदान यांनी त्यांच्या 'पार्टी' 1984 या कल्ट चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विजया मेहता, मनोहर सिंह, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, रोहिणी हट्टंगडी आणि के.के. रैना यांसारखे कलाकार होते. याची कथा एका श्रीमंत व्यक्तीने आयोजित केलेल्या पार्टीवर आधारित होती.
त्यावेळी सोनी राजदान फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन होत्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा त्यांचा अनुभव कसा होता, याबद्दल त्यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले. "जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर काम करत असता आणि प्रत्येक रात्री रात्रभर शूटिंग करत असता, तेव्हा तुमच्या सर्वात सुंदर आठवणी 'पॅक-अप' झाल्यावर झोपायला मिळण्याच्या असतात. मी विनोद करत आहे, तो अनुभव खूप चांगला होता. ज्या प्रकारे आम्ही चित्रपटाचे शूटिंग केले आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेलो, ते त्या काळात खूप नवीन होते. ते पडद्यावर खूप छान दिसत होते." असं त्यांनी म्हटलं आहे.
सोनी राजदान यांनी सांगितले की चित्रपटाचे शूटिंग खूप थकवणारे होते. त्या म्हणाल्या, "विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात शूटिंग करत असता, तेव्हा तुम्ही रात्रभर तिथे उभे राहून तुमच्या शॉटची वाट पाहत असता. कारण कलाकार कधीकधी त्यांचे संवाद बोलताना अडखळतात. मला आठवते, तेव्हा तिथे उभे राहून पायांना खूप वेदना व्हायच्या. मी त्यावेळी खूप नवीन असल्यामुळे, मला इतर कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळाले. अनेक मोठ्या कलाकारांकडून प्रेरणा मिळाली. पण शूटिंगचा अनुभव खूप थकवणारा होता, म्हणजे, त्यात पूर्ण रात्र जायची." याच सोनी राजगान या अलिया भट्टच्या आई आहेत.
नक्की वाचा - Malaika Arora चे फिटनेस रहस्य! 50 व्या वर्षीही घरगुती पदार्थ खाऊन स्वतःला ठेवते फिट
चित्रपट 'सॉंग्स ऑफ पॅराडाइज' बद्दल बोलायचे झाल्यास, तो एक्सेल एंटरटेनमेंट, ऍपल ट्री पिक्चर्स प्रॉडक्शन, आणि रेन्ज फिल्म्स प्रॉडक्शनच्या निर्मिती अंतर्गत बनवला आहे. हा चित्रपट काश्मीरच्या पहिल्या प्रसिद्ध पार्श्वगायिका राज बेगम यांची कथा सांगतो. या चित्रपटात हृतिक रोशनची खास मैत्रीण सबा आझाद आणि सोनी राजदान मुख्य भूमिकेत (राज बेगमच्या भूमिकेत दोन वेगवेगळ्या काळातील) आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त जैन खान दुर्रानी, शीबा चड्ढा, तारक रैना आणि लिलेट दुबे हे कलाकार देखील या चित्रपटात आहेत.