जाहिरात

वयाच्या 50 व्या वर्षीही Shilpa Shetty स्वतःला कशी ठेवते फिट? जाणून घ्या तिचं संपूर्ण Diet Chart

शिल्पा डाएटच्या बाबतीत जरी कठोर असली, तरी ती तिच्या खाण्याच्या आवडीनिवडीही जपते.

वयाच्या 50 व्या वर्षीही Shilpa Shetty स्वतःला कशी ठेवते फिट? जाणून घ्या तिचं संपूर्ण Diet Chart
मुंबई:

Shilpa Shetty Fitness Secret: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या वर्षी तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. पण तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं खूप कठीण आहे. ती जितकी फिट आणि सुंदर दिसते, तितकंच ती आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. शिल्पाला खाण्याची खूप आवड आहे. पण तिचं डाएट रूटीन खूप संतुलित आणि साधं आहे. चला तर मग, शिल्पा शेट्टीचा रोजचा डाएट प्लान काय आहे आणि ती स्वतःच्या आरोग्याची आणि सौंदर्याची काळजी कशी घेते ते जाणून घेऊया.

शिल्पा शेट्टीचा दिवस कसा सुरू होतो?
शिल्पा शेट्टी तिच्या दिवसाची सुरुवात नोनी ज्यूसने करते. यासोबत ती दीड ग्लास कोमट पाणी पिते. जे एनर्जी बूस्टरसारखं काम करतं. त्यानंतर ती ऑइल पुलिंग (Oil Pulling) करते. ऑइल पुलिंग म्हणजे एक आयुर्वेदिक पद्धत आहे. ज्यात ती 5-10 मिनिटांपर्यंत थंड नारळाचं तेल तोंडात फिरवून चूळ भरते. यामुळे तोंडाच्या आरोग्यात सुधारणा होते. यासोबतच ती काही दिवस कोरफडीचा रस (एलोवेरा ज्यूस) घेते. ज्यात ती तुळशीची पाने, गूळ आणि आलं मिसळून पिते. हा उपाय तिने तिच्या 'The Great Indian Diet' या पुस्तकात सांगितला आहे.

नक्की वाचा - Honeymoon trip: लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी हनिमूनला निघाली अभिनेत्री, दोन मुलांनंतर केली स्पेशल ट्रिप

शिल्पा तिच्या नाश्त्यात फायबर युक्त पदार्थ घेते. जसे की ताजी फळं, ओट्स आणि मुसळी (muesli). जर तिला सकाळी घाई असेल, तर ती स्मूदी घेते. यात ती बदामाचं दूध, ओट्स, केळं, मध आणि इतर काही फळं मिसळते. ती सकाळच्या मधल्या वेळेत पुन्हा हलका नाश्ता करते. ज्यात ती होल व्हीट अवाकाडो टोस्ट आणि दोन अंडी खाते. पिंकविलाच्या एका जुन्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की ती साखर खाणं टाळते. त्याऐवजी मध, गूळ किंवा नारळाच्या साखरेचा वापर करते.

शिल्पाचं दुपारचं जेवण
शिल्पा दुपारच्या जेवणात कोणतंही खास डाएट घेत नाही. तर ती घरचं साधं जेवण खाते. यात डाळ-भात, पोळी, चिकन करी आणि भाज्या असतात. जर ती चिकन खात नसेल तर प्रोटीन मिळावं म्हणून ती नक्कीच मासे (फिश) खाते. यासोबतच ती काकडी आणि गाजराचं सॅलड घेते. जेव्हा तिला काहीतरी हलकं आणि एकाच भांड्यात (one-bowl meal) खायचं असतं, तेव्हा ती योगी बाऊल (Yogi Bowl) खाते. ज्यात ब्राऊन राईस किंवा बार्ली, सॅलड, चिकन आणि भाज्या असतात. यासोबतच ती तिच्या जेवणात एक चमचा देशी तूप नक्कीच समाविष्ट करते.

शिल्पाचा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण
शिल्पा दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर जास्त वेळ गॅप ठेवत नाही. संध्याकाळच्या नाश्त्यात ती चहा सोबत अंडं किंवा सँडविच घेते. त्याशिवाय ती रात्री लवकर जेवणं पसंत करते. साधारणपणे संध्याकाळी 7:30 वाजण्यापूर्वी. तिचं रात्रीचं जेवण हलकं असतं. जसे की सूप आणि ग्रील केलेले पदार्थ. ती रात्रीच्या जेवणात कर्बोदकं (Carbohydrate) कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करते.

नक्की वाचा - एकाचवेळी 65 चित्रपटांचं शूटिंग, वर्षात 19 चित्रपट प्रदर्शित, 'या' बॉलिवूड सुपरस्टारने रचला होता विक्रम

शिल्पाचा चीट डे
शिल्पा डाएटच्या बाबतीत जरी कठोर असली, तरी ती तिच्या खाण्याच्या आवडीनिवडीही जपते. म्हणूनच ती दर आठवड्याला रविवार हा चीट डे म्हणून ठेवते. शिल्पा केवळ खाण्यावरच लक्ष देत नाही, तर ती नियमित योग आणि इतर विविध प्रकारचे व्यायाम देखील करते. ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर योगाचे व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com