अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात 'सर्व काही ठीक नाही', 'त्यांचा घटस्फोट होऊ शकतो' या प्रकराच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. बच्चन कुटुंबीयांकडून त्यांची सून ऐश्वर्या रायकडं दुर्लक्ष केलं जातं असा दावा देखील सोशल मीडियावर अनेकदा केला जातो.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या टीकाकारांनी अमिताभ बच्चन यांनाही सोडलेलं नाही. अमिताभ सोशल मीडियावर त्यांची मुलगी श्वेता बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि नात नवेली नंदाबाबतचे अपडेट्स, माहिती पोस्ट करतात. पण सून ऐश्वर्या आणि अभिनेत्री आराध्या बच्चनवर पोस्ट करत नाहीत, अशीही चर्चा समाज माध्यमं तसंच गॉसिप वर्तुळात सुरु असते.
'जागरुक जनता'या इन्स्टाग्राम पेजवरील बच्चन कुटुंबीयांबातचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिलेनं ऐश्वर्याचं दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मांडला आहे. या व्हिडिओवर अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससह अनेकांनी प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी अभिनेत्री सिमी गरेवालनं यावर केलेल्या प्रतिक्रियेकडं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
'तुम्हाला काहीही माहिती नाही. थांबवा' अशी प्रतिक्रिया सिमी गरेवालनं या व्हिडिओवर दिलीय.सिमी गरेवालला नेमकं काय सांगायचं आहे, हे स्पष्ट नसलं तरी तिनं अमिताभ बच्चन यांचा बचाव करण्यासाठी ही पोस्ट केल्याचं मानलं जात आहे.
यापूर्वी एका व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रायनं तिच्या हातामधील साखरपुड्याची अंगठी काढून टाकल्याचा दावा करण्यात आला होता.या व्हायरल व्हिडिओनंतर काही दिवसांमध्ये ऐश्वर्यानं 'पॅरिस फॅशन विक' दरम्यान बोटामधील अंगठी सर्वांना दाखवत ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं. अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये सर्व काही ठीक असल्याचे संकेत ऐश्वर्यानं या कृतीतून जगाला दिले होते.
( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं 20 एप्रिल 2007 रोजी लग्न झालं आहे. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव आराध्या आहे.