सोशल मीडिया कोणाला काय आठवण करून देईल याचा नेम नाही. अशीच एक जुनी आठवण सांगणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत 70-80 च्या दशकातील 4 दिग्गज एकत्र दिसत आहेत. त्यातील तीन कामयचे गायब झाले आहेत. तर एक जण अजूनही यशाच्या शिखरावर चमकत आहेत. तो दिग्गज म्हणजे अर्थात अमिताभ बच्चन. 70-80 च्या दशका जन्मलेला असा कोणी नसेल ज्याने मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट पाहिलेला नसेल. 1978 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अमिताभा बच्चन, विनोद खन्ना, राखी, रेखा आणि अमजद खान यांनी जबरदस्त अभिनय केला होता. या चित्रपटातील 'रोते हुए आते हैं सब...' हे गाण अजरामर आहे. या गाण्यात एका दृष्यात प्रीमियर पद्मिनी, राजदूत, चेतक स्कूटर आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसत आहेत. हे दृष्य लोकांनी चित्रपटात अनेक वेळा पाहीले आहे. पण या दृष्यातील इतर तीन दिग्गजांवर कदाचितच कोणाची नजर गेली असेल. याच तीन दिग्गजांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
प्रीमियर पद्मिनी
प्रीमियर पद्मिनी 1964 साली पहिल्यांदा रस्त्यावर आली. त्यावेळी पद्मिनीचे मॉडल फिएट-1100 डिलाइट हे होते. जवळपास 1200 सीसीची ही कार होती. इटालियन ब्रँडची ही कार प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड ही कंपनी भारतात बनवत होती.1970 मध्ये या कारचे नाव बदलण्यात आले. प्रीमियर प्रेसिडेंट असे तीचे नाव ठेवण्यात आले.पुणे राणी पद्मिनीच्या नावाने प्रीमियर पद्मिनी असे तिचे नाव करण्यात आले. पुढे 2001 पासून कंपनीने ही गाडी बनवण्याचे बंद केले. ही कार लाल बहादुर शास्रीही विकत घेवू इच्छीत होते. पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. 1964 मध्ये या कारची किंमत 12 हजार रूपये होती. पण शास्त्रींकडे 7 हजार रूपये होते. ही कार खरेदी करण्यासाठी त्यांना पंजाब नॅश्नल बँकेकडून कर्ज काढावं लागले होते. पण हे कर्ज फेडण्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुढे त्यांच्या पत्नीने ते कर्ज फेडले. सुपरस्टार रजनीकांतही या कारचे चाहते आहेत. रजनीकांत यांची पहिली कारही पद्मिनी होती. ती आजही त्यांच्याकडे आहे.
राजदूत
जेव्हा कधी बाईकची चर्चा होते तेव्हा एका बाईकचे नाव नेहमीच चर्चीले जाते. ती बाईक म्हणजे राजदूत. एस्कॉर्ट्स कंपनी भारतात राजदूत घेवून आली होती. कंपनीने यामाहा बरोबर आपला उद्योग सुरू ठेवला होता. 1962 साली राजदूर रस्त्यावर आली. त्याला 125 सीसीचे इंजिन होती. शिवाय राजदूत जीटीएस 175 चा पण समावेश होता. यामाहा बरोबर राजदूतनेही भारतीय बाजारात चांगली जागा मिळवली. राजदूत मुळे अनेक कंपन्यांना फटका बसला होता. त्यापैकीच एक इनफील्ड पण होती. राजदूत आजही लोकांच्या लक्षात आहे. अमिताभ बच्चन यांची त्यांच्या अनेक चित्रपटात या गाडीचा वापर केला आहे. शहंशाहमध्येही हीच बाईक दिसून आली होती.
चेतक स्कूटर
बजाज ऑटो ने 1972 साली चेतक स्कूटर बाजारात आणली होती. या स्कूटरचे नाव महाराणा प्रताप यांचा घोडा चेतकवरून घेतले होते. 1972 साली बजाजने जवळपास एक हजार गाड्या बाजारात आणल्या होत्या. त्याची किंमत 8 ते 10 हजार रूपये होती. या स्कूटरची त्या काळात धुम होती. तिची खरेदी करण्यासाठी वाट पहावी लागत होती. मुलीही या स्कूटरसाठी वेड्या होत्या. 1977 साली बजाजने एक लाख चेतक स्कूटरची विक्री केली. तोच आकडा 1986 साली 8 लाखावर पोहचला. 8 हजार पासून सुरू झालेल्या चेतकची किंमत 2005 मध्ये 31 हजारापर्यंत पोहोचली. याच वेळी होंडाने एक्टीवा स्कूटर लाँच केली. यात अनेक चांगली अडव्हान्स फिचर्स होती. त्यानंतर चेतक स्पर्धेत मागे पडली. पुढे कंपनीने 2005 मध्ये स्कूटरचे प्रोडक्शन बंद केले.
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन आज महानायक म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्याकडे सर्व काही आहे. पण जेव्हा ते या इंडस्ट्रीमध्य आले तेव्हा त्यांनाही संघर्ष करावा लागला.बच्चन यांना न्यूज रिडर व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न ही केले. ऑल इंडिया रेडिओने त्यांना त्यांचा आवाज जड आहे असे सांगत रिजेक्ट केले होते. त्यानंतर ते चित्रपटाकडे वळले. सात हिंदूस्तानीतून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीले नाही. ते या चित्रपट सृष्टीचे शहंशाह झाले. आजही त्यांचा चित्रपट सृष्टीत दबदबा आहे. चित्रपट सृष्टीतील महानायक म्हणूनच त्यांच्याकडे पाहीले जाते.