Amitabh Bachchan Son In Law Photos: बॉलिवूडमधील काही मोठ्या कलाकारांच्या लेकींनी बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणे टाळाले. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या नावाचाही समावेश आहे. या दोन्ही महान कलाकारांच्या लेकींनी बॉलिवूडच्या चकाकत्या दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. बिग बी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा यांच्याबाबत माहिती जाणून घेऊया, श्वेताने देखील बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. श्वेता पती निखिल नंदा आणि दोन मुलांसोबत आनंदात जीवन जगत आहे. श्वेता नंदाचे पती आणि उद्योगपती निखिल नंदा हे देखील प्रसिद्धीपासून दूर राहतात. निखिल नंदा (Nikhil Nanda) राजधानी दिल्लीतील रहिवासी आहे आणि कपूर खानदानाशी त्यांचा मोठा संबंध आहे. निखिल नंदा यांचे न पाहिलेले 10 फोटो पाहुया...
दिल्लीमध्ये जन्मलेले निखिल नंदा हे 51 वर्षांचे आहेत, ते एक उद्योगपती आहेत.
निखिल नंदा एस्कॉर्ट कुबोटा लिमिटेड कंपनीमध्ये चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. ही इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे, जी शेती आणि रेल्वेसह विविध बांधकाम क्षेत्रांशी जोडलेली आहे.
निखिल नंदा यांच्या आईचे नाव रितु नंदा असे आहे, ज्या राज कपूर यांची मुलगी आणि ऋषि कपूर यांची बहीण आहेत.
निखिल नंदा वर्ष 1997मध्ये श्वेता बच्चन यांच्याशी लग्न केले आणि यानंतर ती श्वेता बच्चन-नंदा या नावाने ओळखल्या जाऊ लागली.
निखिल नंदा बॉलिवूड पार्टीमध्येही सहभागी होत असतात.
निखिल आणि श्वेता यांना दोन मुलं आहेत. नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा अशी त्यांची नावे आहेत. अगस्त्यने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.
श्वेता नंदा लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
निखिल यांचा जन्म 18 मार्च 1974 रोजी झालाय तर श्वेता यांची जन्मतारीख 17 मार्च 1974 अशी आहे.
निखिल यांनी एका कार्यक्रमामध्ये श्वेताला पाहिले आणि पहिल्याच नजरेत श्वेतावर त्यांचे प्रेम जडले. यानंतर दोघांनी केवळ दहा दिवसांत लग्न केले.
श्वेता आणि निखिल नंदा यांची अनोखी प्रेमकहाणी आहे.