- हर्षाली मल्होत्रा हीने बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीची भूमिका साकारली, ती आता १८ वर्षांची झाली आहे
- २००५ मध्ये जन्मलेली हर्षाली सात वर्षांची असताना साकारलेल्या मूक मुलीची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे
- हर्षालीने वाढदिवसाच्या फोटोंमध्ये साध्या पण ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.
सलमान खानच्या सुपरहीट 'बजरंगी भाईजान' चित्रपटात 'मुन्नी'ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. 3 जून रोजी तिने आपला 18 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिच्या साधेपणाची आणि ग्लॅमरसची झलक पाहायला मिळत आहे. 2005 मध्ये जन्मलेल्या हर्षालीने 2015 मधील चित्रपटात अवघ्या 7 वर्षांची असताना साकारलेली मूक मुलगी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
तिच्या वाढदिवसाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी "तू अजूनही आमच्यासाठी तीच लहान मुन्नी आहेस," अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी तिला थेट सलमान खानची पुढची हिरोईन होण्याचा सल्ला दिला आहे. हर्षालीने वाढदिवसासाठी हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस निवडला होता. कोणताही भपका न करता अगदी साध्या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या साधे पणाचे ही तिच्या चाहत्यांनी कौतूक केलं आहे.

फार कमी लोकांना माहिती आहे की, चित्रपटात येण्यापूर्वी हर्षालीने अनेक टीव्ही मालिका आणि जाहिरातींमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. 'कुबूल है', 'लौट आओ तृषा' आणि 'सावधान इंडिया' यासारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये ती दिसली होती. अभिनयासोबतच ती सध्या तिच्या शिक्षणावरही पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून, तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

'बजरंगी भाईजान' ही चित्रपट जसा बजरंगी म्हणजेच सलमान खानसाठी ओळखला जातो त्याच प्रमाणे तो मुन्नीसाठी ही ओळखला जातो. कारण हा चित्रपट सलमान आणि मुन्नी भोवतीच फिरतो. सलमान सोबत प्रत्येक सीन मध्ये मुन्नी दिसते. तिच्या अभिनयाचं ही कौतूक करण्यात आलं होतं. अवघ्या 7 व्या वर्षी पडद्यावर एकही शब्द न बोलता करोडो लोकांची मने जिंकणारी मुन्नी आता एक ग्लॅमरस यंग स्टार झाली आहे. तिच्या चेहऱ्यावरील तीच जुनी निरागसता आजही चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world