मुस्लीम अभिनेत्रीनं केलं हिंदू बॉयफ्रेंडशी लग्न, धर्म वेगळा असल्यानं होता विरोध

Aasiya Kazi : लिका वधू' आणि 'बंदिनी' मधील अभिनेती आसिया काझीनं तिचा बॉय फ्रेंड गुलशन नयनशी लग्न केलंय.

जाहिरात
Read Time: 1 min
Aasiya Kazi, Gulshan Nain
मुंबई:

Actress Aasiya Kazi married to boyfriend Gulshan Nain : 'बालिका वधू' आणि 'बंदिनी' मधील अभिनेती आसिया काझीनं तिचा बॉय फ्रेंड गुलशन नयनशी लग्न केलंय. आसिया आणि गुलशन हे दोघे बराच काळपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. अभिनेत्रीनं फोटो इन्स्टाग्रामवरवर शेअर केले आहेत. या दोघांचे फोटो पाहून अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

8 वर्षांपासून करत होते डेट

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आसिया आणि गुलशन गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांची सेलिब्रेटी क्रिकेट लीगच्या दरम्यान पहिल्यांदा भेट झाली होती. आसिया मुस्लीम आणि गुलशन हिंदू असल्यानं दोघांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.

घरांच्या तीव्र विरोध असूनही आसिया आणि गुलशन यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. अखेर त्यांच्या प्रेमाला घरच्यांनी परवानगी दिली. त्यानंतर आसिया आणि गुलशन यांचं लग्न झालं. 

आसियानं लग्नात लाल रंगाचा लहंगा घातला होता. तर नवरदेव गुलशननं रॉय ब्लू रंगाची शेरवानी घातली होती. या दोघांचं लग्न हा अगदी खासगी कार्यक्रम होता. त्यामध्ये दोघांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. 

Advertisement

( नक्की वाचा : फेसबुकवर ओळख, घरी बोलावलं आणि बेडरुममध्ये...शाहरुखच्या सहकलाकारावरील आरोपानं बॉलिवूडमध्ये खळबळ )
 

Topics mentioned in this article