मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरे चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आल्याच्या घटना अनेकदा झाल्या आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांवर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोपही झाले आहेत. या यादीमध्ये आता शाहरुख खानसोबत 'जोश' या हिट सिमेमात काम केलेला अभिनेता शरद कपूरचं नावंही दाखल झालंय. एका 32 वर्षांच्या महिलेनं शरदवर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्यानं कामाबाबत चर्चा करण्यासाठी आपल्याला घरी बोलावलं आणि नंतर छेडछाड सुरु केली, असा आरोप या महिलेनं केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फेसबुकवरुन ओळख
पीडित महिलेनं खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार 'पीडित महिला फेसबुकच्या माध्यमातून शरद कपूरच्या पहिल्यांदा संपर्कात आली होती. त्यांची फेसबुकवर नियमित चर्चा होत असे. त्यानंतर त्यांनी दोन वेळा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनही संभाषण केलं. या चर्चेमध्ये शरदनं एका शूटिंग प्रोजेक्टसाठी त्या महिलेसोबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर शरद कपूरनं महिलेसोबत स्वत:चं लोकेशन शेअर केलं. त्यानंतर महिलेला खारमधील स्वत:च्या कार्यालयात येण्यास सांगितलं. लोकेशनच्या ठिकाणी आल्यानंतर ते शरद कपूरचं ऑफिस नाही तर घर असल्याचं महिलेला समजलं.
( नक्की वाचा : 'घटस्फोटानंतर मुंबईत भाड्यानं घर मिळत नव्हतं', लोकप्रिय अभिनेत्रीचा खुलासा! म्हणाली, माझ्यासोबत...)
महिलेनं केलेल्या आरोपानुसार खारमधील घरी ती महिला दाखल झाली. त्यावेळी शरद कपूरनं तिला बेडरुममध्ये बोलावलं. बेडरुममध्ये तिच्याशी गैरवर्तन केलं आणि चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. या प्रकरणात शरद कपूरवर भारतीय न्याय संहितामधील कलम 74 (महिलेवर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), 75 (लैंगिक शोषण) आणि 79 (कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान) अनुसार एफआयर दाखल केली आहे.
दरम्यान या प्रकरणात शरद कपूरनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शाहरुख खानसोबतच्या जोश सिनेमामुळे शरद कपूरचं नाव चांगलंच गाजलं. 'जोश'सह लक्ष्य, त्रिशक्ती, कारगीर LOC या चित्रपटांमध्येही शरदनं काम केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world