Bharatiya Digital Party : भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच 'भाडिपा' या मराठी यूट्यूबर चॅनेललाही 'इंडियाज गॉट लेटेंट' (Indias Got Latent) या समय रैनाच्या वादग्रस्त ठरलेल्या चॅनेलचा फटका बसला आहे. भाडिपने अभिनेत्री सई ताम्हणकर सहभागी असलेला 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' हा कार्यक्रम रद्द केला आहे. 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' हा कार्यक्रम भाडीपाने मागे घेतला. या कार्यक्रमात भाग्यश्री लिमये हिची मुलाखत झाली होती. 14 फेब्रुवारी रोजी होणारा अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या 'इंडियाज गॉट लेटंट' या कार्यक्रमामुळे मोठा गदारोळ झाला आहे. या तिकिटांची रक्कम आगामी 15 दिवसात बँक खात्यात जमा होईल असंही भाडिपकडून सांगण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रणवीर अलाहबादियाने केलेल्या वक्तव्यामुळे India's Got Latent शो वादात अडकला आहे. रणवीरने एका स्पर्धलाका त्याच्या पालकांबद्दल एक संतापजनक सवाल केला होता. 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर सारंग साठे आणि भाडिपाचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन त्यांना ट्रोल केले जात आहे. यामुळे खबरदाराची उपाय म्हणून 'अतिशय निर्लज्ज कांदे-पोहे'शो रद्द केला असावा असा अंदाज आहे. हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा पुण्याच्या मनसे चित्रपटसेनेच्यावतीने देण्यात आला होता. आधीच अलाहबादियाच्या वक्तव्यामुळे राज्यभरात स्टँडअप कॉमेडी आणि युट्यूबवरील विनोदी कंटेन्टवरुन गदारोळ सुरू असताना भाडिपने सुरक्षेच्या कारणास्तव आणि आगामी गोंधळ टाळण्यासाठी शो रद्द केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान सोशल मीडियावर संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींनी सारंग साठे यांचा स्टँडअप कॉमेडी करीत असतानाचा एक व्हिडिओ शेअर करीत टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.