जाहिरात

Who is Gaurav Khanna: मार्केटिंग मॅनेजर ते Big Boss Winner, शांतीत क्रांती करणारा गौरव खन्ना आहे कोण?

Big Boss Winner Gaurav Khanna Full Profile: गौरव खन्नाने फरहान भट्टचा पराभव केला. मार्केटिंग मॅनेजर, लोकप्रिय टीव्ही कलाकार ते आता बिग बॉस विनर असा यशस्वी प्रवास गौरव खन्नाने पूर्ण केला.

Who is Gaurav Khanna: मार्केटिंग मॅनेजर ते Big Boss Winner, शांतीत क्रांती करणारा गौरव खन्ना आहे कोण?

Bigg Boss 19 Winner News: सलमान खानच्या "बिग बॉस 19" या रिअलिटी शोला नवीन विजेता मिळाला आहे. नेहमीप्रमाणेच वाद, विवाद, मैत्री अन् राड्यामुळे बिग बॉसचा हा सीझनही चर्चेत राहिला. गौरव खन्ना हा बिग बॉस 19 चा विजेता ठरला, गौरव खन्नाने फरहान भट्टचा पराभव केला. मार्केटिंग मॅनेजर, लोकप्रिय टीव्ही कलाकार ते आता बिग बॉस विनर असा यशस्वी प्रवास गौरव खन्नाने पूर्ण केला.

बिग बॉस 19चा विनर, कोण आहे गौरव खन्ना?

कानपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी गौरव खन्नाने दोन दशकांहून अधिक काळ टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. 11 डिसेंबर 1981 रोजी  गौरव खन्नाचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर तो मुंबईत आला आणि एमबीए पूर्ण केले. सुरुवातीच्या कारकिर्दीत त्याने एका आयटी फर्ममध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले, परंतु त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 

Shreyas Iyer Affair: श्रेयस अय्यर पडलाय 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात, नाव ऐकताच म्हणाल, छुपा रूस्तम!

गौरव खन्नाने अनेक टीव्ही शो आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्याचा पहिला प्रमुख टीव्ही शो "भाभी" होता, त्यानंतर त्याने "कुमकुम: एक प्यारा सा बंधन", "मेरी डोली तेरे अंगना", "जीवनसाथी: हमसफर जिंदगी के," "सीआयडी" आणि "प्रेम या पहेली: चंद्रकांता" सारख्या शोमध्ये काम केले. 2021 मध्ये, त्याला "अनुपमा" या सुपरहिट शोने ओळख मिळाली, ज्यामध्ये त्याने अनुज कपाडियाची भूमिका केली होती. या शोसाठी गौरवला सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्याचा भारतीय टेलि पुरस्कार देखील मिळाला.

शांतीत क्रांती..

"बिग बॉस 19" मधील गौरव खन्नाचा खेळ त्याचा समजूतदारपणा, शांतस्वभाव आणि रणनीतीमुळे चर्चेत राहिला. आरडाओरडा करुन, गोंधळ घालून आपले विचार मांडणारेच बिग बॉसचा शो जिंकतात असे वाटते, मात्र गौरवने हा समज खोटा ठरवला. सुरुवातीपासूनच त्याने आवाज न करता किंवा कोणत्याही वादात न अडकता, संयम राखला आणि  घरातील प्रत्येक सदस्याच्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण केले. 

त्याचा गेम प्लॅन "शांत पण घातक" होता. तो कमी बोलायचा, पण जेव्हा तो बोलायचा तेव्हा त्याचा संपूर्ण घरावर परिणाम व्हायचा. बिग बॉस विनर गौरव खन्नाला ट्रॉफीसह भरघोस रोख बक्षीस मिळाले. सलमान खानने गौरवला ₹50 लाख देण्याची घोषणा केली. शिवाय गौरवला एका टास्क दरम्यान जिंकलेली कार देखील मिळेल.

Dhurandhar Collection: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा! 'कांतारा'लाही धोबीपछाड; किती झाली कमाई?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com